नमस्कार मित्रमंडळी,
नुकताच नाशिक मधील त्र्यंबकेश्वरला जाण्याचा योग जुळून आला.त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळ असलेले हिदू तीर्थस्थान आहे.भगवान शंकराची एकूण जी १२ ज्योतिर्लिंग आहेत त्यातले एक म्हणजे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर!या ठिकाणी सिह्स्थ कुंभमेळा देखील भरतो.तर हे पवित्र ठिकाण नाशिक पासून १८ किलोमीटर्स अंतरावर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे.
दहाव्या शतकात शिलाहार राजा झंझ याने गोदावरी पासून भीमा नदी दरम्यान जी १२ शिव मंदिरे बांधली त्यातली एक मंदिर म्हणजे त्र्यंबकेश्वर येथील शिव मंदिर!इ.स.१७५५-१७८६ या कालावधीत हेमाडपंथी स्थापत्यशैलीने नानासाहेब पेशवे यांनी या मंदिराची नव्याने बांधणी केली होती.ब्रह्मगिरी पर्वत आणि परिसर खूपच निसर्गरम्य आहे.हिंदू धर्मातले असंख्य पवित्र विधी आणि पूजाअर्चा या मंदिर परिसरात केल्या जातात.या सुंदर आणि पवित्र ठिकाणाला संधी मिळाली तर अवश्य भेट द्या.मी या परिसरातले सौदर्य आणि पावित्र माझ्या कॅमेराच्या लेन्स मधून टिपण्याचा एक छोटा प्रयत्न केला आहे.ती छायचित्रे तुम्हाला खाली पाहता येतील.
धन्यवाद!

0 comments:
Post a Comment