मित्रमंडळी,
चिंचवडला गेलो असताना,मला जिजाऊ पर्यटन केंद्र पाहण्याचा योग आला.खरतर मी "श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर" पाहण्यासाठी गेलो होतो आणि मला तिथे शेजारीच असलेले हे "जिजाऊ पर्यटन केंद्र" पाहता आले."श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिराच्या" बाजूलाच हे केंद्र आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हे उत्तम पर्यटन केंद्र निर्माण केलेले आहे.या केंद्रामध्ये मुलाना खेळण्यासाठी वेगवेगळया प्रकारची खेळणी आहेत.त्या व्यतिरिक्त सर्वाना व्यायाम करता यावा यासाठी वेगवेगळ्या उपकरणांची सोय केलेली आहे.या केंद्राचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे इथे वेगवेगळ्या प्राण्यांच्या हुबेहुब प्रतिकृती ठेवलेल्या आहेत.जिराफ, हत्ती, मगर, अस्वल, गेंडा, हरीण, गाय व वासरू या प्राण्यांच्या प्रतिकृती इथे ठेवलेल्या आहेत. नदी पात्रात मगरीची प्रतिकृतीही ठेवलेली आहे.
सेल्फी काढायची आवड असेल.तर हे ठिकाण तुमच्यासाठीच आहे.माझ्या बहिणींनी या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. :))सकाळी ५ ते संध्याकाळी ८पर्यन्त हे सर्व नागरिकांसाठी खुले असते.या ठिकाणी काढलेली छायाचित्रे तुम्हाला पाहता यावी यासाठी इथे ठेवत आहे.
श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर
0 comments:
Post a Comment