डेक्कन कडून कोथरूडला जायचे होते,ऑटोरिक्षा केली,रिक्षावाल्याचे उत्तर,मीटर पेक्षा 20 रुपये जास्त घेईन.
मी मनातल्या मनात म्हटले हा भिकारी दिसतोय,म्हटले चला!कोथरूडला पोहोचल्यावर 54 रुपये झाले,तरी रिक्षावाला साहेब 80 द्या.म्हटलं मीटर पेक्षा 20 रुपये जास्त देणार होतो 74 घे,सुट्टे मी देतो.
2)प्रसंग दुसरा:
रात्री 1:45 ला यशवंतराव नाट्यगृह इथून ओला कॅब बुक केली,डेक्कन जिमखान्याला PMT बस डेपो पर्यंत सोडायला सांगितले.
मला डेक्कनच्या आधीच सोडून पळाला,मी नवीन असल्याने मला कळले नाही,तरी त्याच्या पोटावर पाय नको म्हणुन 5 स्टार्स रेटिंग्स दिले.गुगल मॅप सुरू करून रिकाम्या रस्त्यावरून एकटाच चालत निघालो,साधारण 2:20 ला हॉटेल मध्ये पोहोचलो,तसेही आम्हा मुंबईकरांचे गट्स जबरदस्त असतात,ते एकटे काहीही करतात,मग प्रसंग काही असो,नो टेंशन!बाकी रस्त्यावरचे कुत्रे बघूनही अजिबात भुंकले नाहीत.😂
3)प्रसंग तिसरा:चिंचवड वरून बहिणीच्या घरी निघालो,एरवी 15 रुपये शेअरिंग घेतात, पण 8:45 झाल्याने पहिला रिक्षावाला भेटला तो 120 रुपयात सोडेन म्हणाला.
त्याला म्हटले एक काम कर तू जाऊन ये😂
मग दुसरा 80 रुपयात तयार झाला,बहिणीची बिल्डींग जवळ आल्यावर त्याला 100ची नोट काढून दिली.
त्यावर रिक्षावाला म्हणाला,सुट्टे नाहीत,500 ची नोट आहे.त्याला म्हटले,सुट्टे मी देतो माझ्याकडे टाकसाळ आहे.नाहीतर 100 रुपये गिळायची त्याने तयारी ठेवली होती.
प्रसंग चौथा:पिंपरी वरून पुण्याला निघालो,रिक्षावाला 300 रुपयात तयार झाला,पण पालखीमुळे रस्ता बंद झाला,त्याला दुसरा रस्ता माहीत नव्हता म्हणून गुगल मॅप सुरू करून पर्यायी रस्ता मीच दाखवला😂पुणा स्टेशनला पोहोचल्यावर,500 ची नोट दिली,तर 350 रुपये घेतले,म्हणाला साहेब परत जायला कोणी मिळणार नाही आता.
त्याला म्हटले ठीक आहे,ठेव 50 जास्त,पण तुला माझ्यामुळे नवीन रस्ता कळला😂त्याबद्दल तू माझे आभार मानले पाहिजेस!इतकं बोलुन मी हसलो आणि पुढच्या प्रवासाला निघालो😎
धन्यवाद
मित्रमंडळी,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
धन्यवाद
मित्रमंडळी,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment