मित्रमंडळी,
पुणेदर्शन करताना आणखी एक ठिकाण पाहायची संधी मिळाली ते म्हणजे "डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्युजियम आणि मेमोरियल"जे पुण्यामध्ये सेनापती बापट मार्ग,वादरवाडी इथे आहे.सिम्बिओसिस या पुण्यातल्या अग्रगण्य संस्थेमार्फत याचे व्यवस्थापन आणि देखभाल केली जाते.या म्युजियमच्या मध्यभागी डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांचा संगमरवरी पुतळा आहे.हा पुतळा त्याचे आग्रा येथिल दोन अनुयायी भारत सिंग आणि रामदास यांनी दिलेला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या वस्तू सुद्धा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत.या व्यतिरिक्त त्यांनी वापरलेले कपडे,भांडी,त्यांच्या प्रवासातले साहित्य,बसायची खुर्ची,ज्या खुर्चीवर बसून त्यांनी राज्यघटना सुपूर्द केली ती खुर्ची,त्यांचे व्हायोलिन,त्यांनी लिहिलेली पत्रे,वेगवेगळी छायाचित्रे,त्यांच्या विविध पदव्या,ज्या बिछान्यात शेवटचा श्वास घेतला तो बिछाना,त्यांचा अस्तीकलश,त्यांच्या संबंधीची वेगवेगळी कागदपत्रे,वर्तमानपत्राची कात्रणे या ठिकाणी तुम्हाला पहायला मिळतील.
यातली काही छायाचित्रे मी तुम्हाला पाहता यावी म्हणून या ठिकाणी ठेवत आहे.तुम्ही अवश्य या ठिकाणाला भेट द्या तुम्हाला ते नक्की आवडेल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर
0 comments:
Post a Comment