मित्रमंडळी,
पुण्याला कामानिमित्त आलो होतो आणि आता फावल्या वेळात पुणेदर्शन करतो आहे. आज पाहिलेले
पहिले ठिकाण म्हणजे "केसरी वाडा" यालाच टिळक वाडा असेही म्हणतात.बाळ गंगाधर टिळक यांचे या ठिकाणी वास्तव्य होते.टिळकांनी स्थापन केलेल्या केसरी या वृत्तपत्राचे कार्यालय या वाड्यात आहे.सध्या या वास्तूमध्ये संग्रहालय आहे.पुण्यात आल्यावर या ठिकाणाला अवश्य भेट द्या!लोकमान्य टिळक यांच्याशी संबंधित वस्तू आणि कागदपत्रे जर तुम्हाला पाहायची असतील तर हे त्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे आणि इतिहासातील आठवणीना उजाळा द्यायची इच्छा नक्कीच पूर्ण होईल!या ठिकाणी काढलेली काही छायाचित्रे इथे तुम्हाला पाहता यावी म्हणून ठेवत आहे.त्यामुळे अधिक काही लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहून त्याचा आनंद घ्यावा.
धन्यवाद!
नमस्कार,
मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.
1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.
**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.
कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट
४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे
savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra
धन्यवाद :-)
0 comments:
Post a Comment