मित्रमंडळी,
या वेळी पुण्याला दिलेल्या भेटीत आणखी एक ठिकाण पाहता आले ते म्हणजे राजा दिनकर केळकर संग्रहालय!
स्व. दिनकर केळकर यांच्या अथक प्रयत्नातून या संग्रहालयाची निर्मिती झालेली आहे.एका व्यक्तीच्या परिश्रमातून किती मोठी गोष्ट घडू शकते याची प्रचीती हे संग्रहालय पाहिले की येते.
पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील हे वस्तू संग्रहालय पुण्याचे भूषण म्हणावे लागेल.आपल्या एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर (ज्याचे नाव राजा होते),त्यांनी या संग्रहालयाला राजा दिनकर केळकर संग्रहालय असे नाव दिले. या ठिकाणी मोबाईल आणि कॅमेराने फोटो काढण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागते.
संपूर्ण संग्रहालय व्यवस्थित पाहता यावे यासाठी तुम्हाला ३ तास वेळ देणे गरजेचे आहे.संपूर्ण वास्तू स्वच्छ आणि प्रत्येक वस्तू व्यवस्थित पद्धतीने ठेवलेली आहे,हे या संग्रहालयाचे वैशिष्ट म्हणावे लागेल.मी अतिरिक्त शुल्क भरून मोबाईल कॅमेराने काही छायाचित्रे काढली,त्यातील काही तुम्हाला पाहता यावी यासाठी या ठिकाणी ठेवत आहे.पण स्वत:च्या नजरेने प्रत्यक्ष जावून पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो.आपल्या मुंबई आणि इतर शहरात,राज्यात आणि परदेशात असलेल्या मित्रमंडळीना या अप्रतिम ठिकाणाची माहिती द्या.जेणेकरून अधिकाधिक व्यक्ती या ठिकाणाला भेट देतील. आणि अश्या जागा जतन करण्यासाठी जो खर्च येतो त्यात थोडा हातभार लागायला मदत होईल.जर तुम्ही कधी पुण्याला गेलात तर या ठिकाणाला अवश्य भेट द्या.तुम्हाला ते नक्कीच आवडेल!
धन्यवाद!
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर
0 comments:
Post a Comment