मित्रमंडळी,
शनी शिंगणापूर ज्याना माहित नसेल अशी व्यक्ती विरळच असेल.महाराष्ट्रातील शिंगणापूर इथे शनी देवाचे हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.या ठिकाणी शनी देवाची स्वयंभू काळ्या रंगाची पाषाणाची मूर्ती आहे.साधारण ५ फुट ९ इंच उंची आणि १ फुट ६ इंच रुंदी असलेली पाषाण मूर्ती एका चौथ-यावर विराजमान आहे.शिंगणापूर गावाच वैशिष्ट्य म्हणजे या गावात कोणत्याही घराला दरवाजा नाही.कधीही कडी कुलूप,टाळे लावून ठेवले जात नाही.शनी देवाची तशी आज्ञा आहे अशी एक मान्यता आहे.प्रत्येक शनिवारी इथे शनी देवाची पूजा करण्यासाठी गर्दी होत असते.अश्या ठिकाणी जावून मला दर्शन घेता आले याचा आनंद आहेच.आणि मी या ठिकानी केलेले छायाचित्रण तुम्हाला पाहता यावे म्हणून माझ्या या अनुदिनीवर ठेवत आहे.तुम्हाला ते नक्की आवडतील.जरूर पहा!
धन्यवाद!
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
नमस्कार,
मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.
1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.
**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.
कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट
४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे
savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra
धन्यवाद :-)
0 comments:
Post a Comment