मित्रमंडळी,
पुणे भेटीच्या दरम्यान आणखी एक ठिकाण बघण्याचा योग आला तो म्हणजे "राजीव गांधी प्राणीसंग्रहालय आणि वन्यप्राणी संशोधन केंद्र,कात्रज"हे पुण्यात भारती विद्यापीठाजवळ पुणे सातारा महामार्गावर कात्रज येथे आहे.१३० एकरमध्ये पसरलेल्या या प्राणीसंग्रहालयाचा समावेश पुण्यातल्या लोकप्रिय स्थळामध्ये होतो.
पुणे नगरपालिकेमार्फत याचे व्यवस्थापन पाहिले जाते.इथे तुम्हाला वेगवेगळे प्राणी पहायला मिळतील.याचा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे सर्पोद्यान,इथे तुम्हाला वेगवेगळ्या जातीचे साप आणि त्याच्या विषयीची माहिती देणारे फलक पाहायला मिळतील.मगरी,कासव आणि इतर सरपटणारे प्राणी इथे मोठ्या प्रमाणात आहेत.सोबत बच्चे कंपनी असेल किंवा तुमच्यातले लहान मुल अजूनही तुमच्यात असेल तर नक्कीच या ठिकाणाला भेट द्या.सहकुटुंब एक दिवसाची सहल सुद्धा तुम्ही सहज करू शकता.
सकाळी १०:३० ते ५:३० पर्यंत तुम्हाला तिथे प्रवेश करता येतो.मात्र दर बुधवारी हे बंद असते.तर मित्रमंडळी,कधी पुण्याला आलात तर या ठिकाणाला जरूर भेट द्या.मी माझ्या कॅमेराने काढलेल्या काही छायाचित्रांचा मी इथे समावेश केला आहे.
धन्यवाद!
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment