५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

एका वेबसाईट आणि App च्या निर्मितीची गोष्ट-Savaniee Ravindrra-Website आणि Android App


मित्रमंडळी,
           तुम्हा सर्वांना माहीतच असेल काही दिवसापूर्वी तुमच्या आवडत्या गायिकेने म्हणजेच "नाही कळले कधी" हे लोकप्रिय गाणे गाऊन तुमच्या रसिक मनावर मोहिनी घालणा-या आणि  " होणार सून मी या घरची" या लोकप्रिय मालिकेतून जिचा आवाज तुमच्या पर्यंत पोहोचला त्याच गायिका सावनी रवींद्रने या वर्षी तिची अधिकृत वेबसाईट आणि Android App तिच्या चाहत्यांसाठी उपलब्ध करून दिले आणि असे करणारी ती पहिली मराठी गायिका बनलेली आहे.कारण आता पर्यंत एकाही मराठी गायक अथवा गायिकेकडे स्वत:च "अधिकृत" Android App नाही.हीच गोष्ट हेरून, ते app आपल्या चाहत्यांना उपलब्ध करून देणारी ती पहिली मराठी गायिका आहे,जिने हे दाखवून दिले आहे की फक्त गायन क्षेत्रातच नाही तर तंत्रज्ञानात होणारे बदल स्वीकारणातही ती तितकीच उजवी आहे.
आज याच वेबसाईट आणि app च्या निर्मितीची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे.
तिची अधिकृत वेबसाईट: https://www.savaniravindra.com
तीच अधिकृत फेसबुक App:https://apps.facebook.com/singersavaniee/
तिच अधिकृत Android App: https://play.google.com/store/apps/details?id=com.savani.ravindra

हे Android App कसे डाउनलोड कराल?
   पहिली मराठी गायिका जिचे ३ भाषांमध्ये android app आहे.जे मोफत डाउनलोडसाठी गुगल प्ले स्टोर वर उपलब्ध आहे.तिचे फोटो,कार्यक्रमाची माहिती मोबाईल वर मिळवण्यासाठी तिचे ऑफिशियल अँप डाउनलोड करा आणि तिचे मॅसेज आणि नोटिफिकेशन्स मोबाईल वर मिळवा.अँप डाऊनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोर उघडा.सर्चमध्ये savaniee ravindrra टाईप करा आणि हे फ्री app तुमच्या मोबाईल वर install करा.


वेबसाईट आणि android app च्या निर्मितीची गोष्ट:
            या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी जवळ जवळ ३ वर्ष मागे जावे लागेल.माझ्या मित्रपरीवारात बहुतेक लेखन आणि कला,चित्रपट क्षेत्राशी संबंधित मंडळी आहेत.मी स्वत: अभियंता असून सध्या तंत्रज्ञानाशी संबधित क्षेत्रात व्यस्त असलो तरी कवितांची पुस्तक लिहिलेली आहेत,मी लिहिलेले गाणे,गायक सुबोध साठेने एका अल्बममध्ये गायलेले आहे.त्यामुळे फेसबुकवरच्या मित्रमंडळीमधूनच सावनीची आणि माझी फेसबुक वर ओळख झाली.तोपर्यंत मला तिने सारेगामामध्ये भाग घेतला होता,याची माहिती नव्हती,हि गोष्ट मला नंतर कळली.मला कला क्षेत्राची आवड आहे पण सवड नव्हती. त्यात ही वयाने "माझ्यापेक्षा तरी" लहान आहे आणि त्यावेळी अस जाणवलं की स्वत:च्या कामाबद्दल माहिती द्यायला आणि स्वत:च्या कामाची मार्केटिंग करायला थोडी बुजते,मागे राहते.(स्वत:च नीट मार्केटिंग करने जमले नाही,तर ब-याचदा गुणी असून पण लोक मागे राहतात आणि प्रसिद्ध असे पर्यंतच लोक लक्षात ठेवतात,त्यामुळे संधी निर्माण करता आली पाहिजे आणि मग संधीचे सोने करता आले पाहिजे अस माझ वैयक्तिक मत आहे)मी स्वत: मराठी,इंग्लिश,हिंदी विकिपीडियावर लिहितो,त्यामुळे मी ठरवल की तिची माहिती देणार एक पान विकिपीडियावर तयार कराव.मग तिची माहिती गोळा करून,माहितीचे संदर्भ गोळा करून मी तिच्याबद्दल आधी मराठी विकिपीडियावर,मग इंग्लिश आणि हिंदी विकिपीडियावर माहितीचे पान तयार केले. हे करताना मला असे जाणवले की तिच्याकडे स्वत:च्या वेबसाईटचे डोमेन नेम आहे पण ते रिकामे आहे.शेवटी तंत्रज्ञानाची,कोडींगची मला आवड असल्यामुळे अस रिकामे डोमेननेम पाहून ती गोष्ट मला स्वस्थ बसू देईना.मग मी तिला म्हटले की तुझी वेबसाईट बनवून सर्वांसाठी उपलब्ध करून देवू या!तिला हि कल्पना आवडली,आपण या विषयावर बोलू अस म्हणून ती नंतर विसरली(कामाचा व्याप).मग मी स्वत:च पुढाकार घेवून तिच्या नावाने एक ब्लॉग तयार केला आणि तिला दाखवला की हे बघ अशी काहीशी तुझी वेबसाईट दिसेल.(हा तो जुना ब्लॉग  http://savaniravindra.blogspot.in/ जो ३ वर्षाआधी होता पण आता अधिकृत  वेबसाईट आणि android app  असल्यामुळे मी काढून टाकला आहे.)तिला ते पण आवडल,परत शांत बसली याच कारण मी आधीच सांगितले आहे.त्या वेळी नवीन नवीनच android app सगळीकडे दिसायला लागली होती.मग माझ्या डोक्यात असा विचार आला की मग तिचे android app का बनवू नये?मला त्या वेळी android app कसे बनवतात याचे पुरेसे ज्ञान नव्हते.मग कुठून तरी माहिती मिळवली की एक वेबसाईट android app बनवून होस्ट करायला देते.मग मी तिथे ते app बनवले,(त्या जुन्या appची लिंक इथे आहे.http://app.appsgeyser.com/972272/Singer%20Savani%20Ravindra

           तोपर्यंत १ वर्षाहून अधिक काळ पूर्ण झाला होता आणि मी मधल्या काळात कोडींग करणे जो माझा छंद आहे ते शिकत होतो.मधल्या काळात मोबाईलचा वापर वाढत गेला ,तंत्रज्ञान बदलत गेले आणि वेबसाईट मोबाईल फ्रेंडली बनू लागल्या,मग अस वाटू लागले की जुने सर्व बदलून काही नवीन कराव,मे २०१५ च्या आसपास मी तिच्या मोबाईल फ्रेंडली वेबसाईटचे काम सुरु केल.तिच स्वत:च app असाव आणि अस करणारी मराठी मधली पहिली गायिका ती असावी असे मला मनापासून वाटलं.जेणेकरून तिच्या चाहत्यांच्या मोबाईल मध्ये तिला एक स्थान असावे आणि आम्ही स्पेशल नोटीफिकेशन सिस्टीम वापरलेली असल्यामुळे तिचे मेसेज,कार्यक्रमाची माहिती तिच्या चाहत्यांना मिळत राहावी अशी योजना त्यात करायची होती.मग मी गुगल प्ले स्टोर वरती app कस बनवायचं ते शिकायला सुरुवात केली आणि तिच्या appच्या निर्मितीचे काम सुरु झाल.२२ जुलै २०१५ म्हणजे तिच्या वाढदिवशी तिची अधिकृत वेबसाईट आणि android app उपलब्ध करून द्यायचं असे ठरलं होत.मी २१ जुलै २०१५ पर्यंत तिच्या आतापर्यंत  झालेल्या कामाची सर्व माहिती मिळवून मग ती गाणी असोत,व्हिडीओ असोत,मुलाखतीचे व्हिडीओ असोत सर्व जमवून पूर्ण वेबसाईट आणि app तयार केल,माझ सुरुवातीला अस मत होत की तीच जे काही आहे त्याचा पूर्ण मालकी हक्क तिच्याकडेच राहावा,म्हणून ते तिच्या अकाऊंट वरूनच कराव.पण पहिली अडचण आली ती म्हणजे गुगल प्ले कडून डेव्हलपर अकाऊट घेताना.तिच बँक खाते भारतीय बँकेत असल्यामुळे तिला काही केल्या गुगल प्ले कडून डेव्हलपर अकाऊट मिळवता आले नाही.मग आधी वेबसाईट पब्लिश करून मग पुढेमागे app प्रसिद्ध करायचे ठरले. २१ जुलै २०१५ रोजी ती स्वत: एका कार्यक्रमात व्यस्त होती,पूर्ण कार्यक्रम तीच होस्ट करत होती.त्यामुळे वाढदिवशी जेव्हा परत आली तेव्हा जाम दमली होती.मग आज वेबसाईट पब्लिश करायची की नंतर करायची या मुद्यावर चर्चा करून आम्ही दुस-या दिवशी वेबसाईट प्रसिद्ध करायचे ठरवले.पण " होणार सून मी या घरची" लोकप्रिय झाल्यामुळे तिला ब-याच कार्यक्रमाची आमंत्रण येत होती,त्या प्रवासाचा आणि पावसाळी वातावरणाचा जो परिणाम व्हायचा तो झाला आणि ती पुढचे काही दिवस आजारी पडली आणि वेबसाईट पब्लिश करायच काम लांबणी वर पडल. त्यानंतर कार्यक्रमाची व्यस्तता आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे असलेला तिचा बुजरा स्वभाव(इतक सोडलं तर खूप गुणी आणि विनम्र आहे,पण कसतरी वाटून घेते त्याला इलाज नाही.) या गडबडीत महिन्या मागून महिने गेले आणि काम जिथे होते तिथे थांबले.
            कदाचित सर्वाना या गोष्टीच अप्रूप वाटेल,पण या जवळ जवळ दोन,सव्वा दोन वर्षाच्या काळामध्ये आम्ही कधीच भेटलो नव्हतो,शेवटी तिने मला तिच्या कार्यक्रमासाठी जेव्हा निमंत्रण दिले तेव्हा प्रथमच आम्ही प्रत्यक्ष भेटलो ते सुद्धा मध्यंतरात ५ मिनिटासाठी. ती घरातलीच छोटी असल्यासारखी वाटते आणि आहेच तशी.बाकी नेहमी  संपर्कात असल्यामुळे अस कधी वाटलच नाही की भेटलोच नाही. तसेही तिचा फायदा होणार असेल असे वाटले की ती गोष्ट करवून घेण्यासाठी जाम डोक खातो मी.त्याला इलाज नाही.     
       शेवटी २०१६ मध्ये तिच्या डोमेननेमची वैध्यता संपायला आली तेव्हा मी तिला आठवण करून दिली की अग आपल काम राहीलच की(किती ही माझी चिकाटी आणि सहनशीलता :p) परत एकदा योग्य दिवस म्हणजे तिचा वाढदिवशी वेबसाईट तिच्या चाहत्यासाठी उपलब्ध करून द्यायचे ठरलं.मग २२ जुलै २०१६ रोजी म्हणजे तिच्या वाढदिवशी ती तिच्या चाहत्यांना फेसबुक लाईव्ह मधून सामोरे जाणार होती.आणि या वेळी पण कार्यक्रमाच्या व्यस्त पणामुळे ती दमलेली होती,परत तो प्रश्न आला आजच करू या का? आधीच्या अनुभवाप्रमाणे विचार केला आणि  म्हटले आजच कर,मग त्याप्रमाणे फेसबुक लाइव्ह सेशन मध्ये सावनीने वेबसाईट तिच्या चाहत्यांना उपलब्ध करून दिली.
           आता राहिला प्रश्न app चा,शेवटी मी दिवाळीच्या सुमारास माझ्या स्वत:च्या गुगल प्ले स्टोर अकाऊन्ट करून ते पब्लिश करायचं ठरवलं,त्यासाठी डेव्हलपर अकाऊन्ट घेतलं, आणि तिला हे app गिफ्ट करायचं ठरवलं,पण परत अडचण आली ती म्हणजे तुम्ही दुस-याची माहिती असलेले app गुगल प्ले स्टोर वर पब्लिश करू शकत नाही.तसे कोणी केले तर त्याचे खार्ते रद्द होते.त्यामुळे मी पब्लिश केलेले app त्यांनी अडवले.शेवटी आम्ही त्यांना यशस्वीपणे अधिकृत पत्र देवून आणि हीच खरी सावनी आहे.

हे पटवून देऊन ते गुगल प्ले स्टोर वर प्रसिद्ध केले.काही दिवस चाचणी प्रक्रीये मध्ये ठेवून योग्य वेळी ते तिच्या चाहत्यांसाठी अधिकृतपणे उपलब्ध करून दिले.आणि मला मनापासून जे वाटत होत की ती स्वत:ची अधिकृत वेबसाईट आणि android app पहिली मराठी गायिका असावी.ती गोष्ट प्रत्यक्षात उतरली याचच मला मोठ समाधान आहे.
          २०१६ आज संपते आहे आणि २०१७ सुरु होते आहे,नवीन नवीन क्षितीज खुणावत आहेत,तंत्रज्ञान वेगाने बदलते आहे.हे जे नवीन बदल आहेत ते तुम्ही किती वेगाने स्वीकारता त्यातच तुमच्या विजयाची नांदी असते.मला ज्या नवीन गोष्टी कळतात त्या मी तिला सांगतो आहे आणि ती अत्यंत गुणी,नवीन कल्पनांचा विचार करणारी,नवे प्रयोग करणारी,त्या अंमलात आणायचा प्रयत्न करणारी,अत्यंत नम्र,down to earth,सुस्वभावी मुलगी आहे.हाच स्वभाव माणसाला एका उंचीवर घेवून जातो.ती तशी आहे.
        बाकी माझा डोके खावून एखादी गोष्ट पटवून देण्याचा जो हातखंडा आहे,स्वभाव आहे(किती सहनशील मी)तो लक्षात घेता आणि ती माझ्यापेक्षा वयाने लहान असल्यामुळे यापुढेही तिला लागेल ती मदत करणे मी सुरूच ठेवणार आहे.कारण तिची होणारी प्रगती पाहायला मला नेहमीच आवडेल.जे काही लिहिलेले आहे ते उत्स्पुर्तपणे लिहिले आहे.काना,मात्रा,वेलांट्यां,शब्द यांच्या चुका असू शकतात.जे आहे ते गोड मानून घ्या आणि तिच अधिकृत app डाउनलोड करा. :-)

tv9 मराठी interview
चाहत्यांचे आभार मानताना!



धन्यवाद!
तुमचा मित्र!
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About Prashant

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

3 comments:

  1. Thanks a lot for ur support prashant! Really means a lot to me!

    ReplyDelete
  2. Thanks a lot for ur support prashant! Really means a lot to me!

    ReplyDelete