मित्रमंडळी,
बरेच जन मला विचारत होते आणि विचारतात की तुम्ही ब्लॉग वर राजकीय विषयाशी निगडीत लिखाण का करत नाही?त्याच उत्तर थोडक्यात देण्याचा आज मी प्रयत्न करतो आहे.
मी २००८ पासून ब्लॉगिंग करत आहे,या ठिकाणी विविध विभागात लिहिलेली माहिती आणि कृती मी स्वत: करून,खात्री झाल्यावर, मगच लिहिली आहे.ब-याच गोष्टी,मग त्यात मी केलेले छायाचित्रण असो,कविता,चारोळ्यांचे लिखाण असो,बनवलेले युटूब व्हिडीओज् असोत,ऑडिओ असो अथवा शोर्ट फिल्म असो,तंत्रज्ञान,ब्लॉगिंग संबंधीचे लिखाण असो,हे सर्व मी स्वत: केलेले आहे. ,हे करण्यासाठी स्वत:चा वेळ खर्च केलेला आहे...यातून कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक फायदा होत नसला तरी मानसिक समाधानासाठी ही गोष्ट मी करत आलेलो आहे.हे सर्व मित्रमंडळी आणि इतरां सोबत या ब्लॉगच्या माध्यमातून हे सर्व शेअर केले आहे.
राजकीय,सामजिक बिनबुडाच्या चर्चा करण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ उपलब्ध असल्यामुळे असे लिखाण मी या ठिकाणी करणे मुद्दाम टाळले आहे.कारण आपली प्रतिक्रिया,आवाज संबंधित व्यक्तीपर्यंत सहज आणि चटकन पोहोचवण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ जास्त उपयोगी आहेत. जिथे शक्य असेल तिथे तिथे मी माझ मत स्पष्ट शब्दात मांडतो आणि त्या त्या व्यक्तीपर्यंत माझा आवाज पोहोचवतो.पण ब-याच वेळा होते काय?या चर्चामधून बाकी काही साध्य होतच नाही.नुसत्या चर्चा होतात आणि शेवटी सर्व शांत होते.दरवेळी सन्माननीय तोडगा सुचविण्याचा माझा प्रयत्न राहिलेला आहे,पण ब-याच वेळा होते काय? दोन्ही कडचे समजून घेत नाहीत आणि शेवटी पटले तरी काही दिवसात विसरून जातात.
म्हणून म्हणतो,कृती महत्वाची,या चर्चांना काहीही अर्थ नाही.
उदा.मराठा आरक्षणावर जे राजकारण सुरु आहे,त्यावर न राहून मी दोन्ही कडच्याना सन्माननीय तोडगा सुचवला होता.त्याला ७४३लाईक्स आणि ३५२ रिप्लाय आले होते.दोन्ही कडच्यानी पसंती दर्शवली,मान्य केले अमान्य केले,पण शेवटी अश्या चर्चाचा उपयोग काय?जोपर्यंत माणसाची स्वत:हून स्वत:मध्ये बदल करायची तयारी नसते.म्हणून म्हणतो शेवटी कृती महत्वाची आणि याचसाठी राजकीय विषयावर ब्लॉगवर लिखाण करणे मी टाळतो आणि तेच लिहितो तंत्रद्याना संबंधी लिखाण करतो जे समाजाच्या आणि प्रत्येकाच्या उपयोगी पडेल.मग जात,धर्म.पंथ कोणताही असो. :-)
धन्यवाद,
तुमचा मित्र
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment