मित्रमंडळी,
तुम्हाला जर छायाचित्रणाची आवड असेल तर या छंदातून ऑनलाईन पैसे कसे कमावायचे ते सुद्धा तुमच्या मोबाईल अॅप मधून याची आज आपण माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
विशेष सुचना:हे अॅप वापरून त्यावर आपण काढलेली छायाचित्र विकायला ठेवण्यापूर्वी त्या छायाचित्राचे प्रताधिकार(कॉपीराईटस)तुमचेच असले पाहिजेत याची काळजी घ्या.कारण प्रताधिकार(कॉपीराईटस) नसलेली छायाचित्र विकण गुन्हा आहे.
आता आपण हे अॅप वापरून पैसे कसे कमावायचे याची माहिती करून घेणार आहोत.
१)प्रथम तुमच्या मोबाईच्या गुगल प्ले स्टोर मधून foap हे अॅप डाउनलोड करून इंस्टाल करा.
त्याची लिंक खाली दिलेली आहे अथवा गुगल प्ले स्टोरमध्ये foap शब्द शोधून ते इंस्टाल करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.foap.android&hl=en
२)अॅप इंस्टाल झाल्यावर तुम्हाला तुमचे खाते बनवावे लागेल,फेसबुकखात्याचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून तुम्ही तुमच्या खात्याची पडताळणी पूर्ण करा.
३)पडताळणी पूर्ण झाल्यावर छायाचित्र विकल्यावरमिळणारे पैसे तुमच्या बँकेत जमा करण्यासाठी तुमच्याकडे पेपाल खाते असणे आवश्यक आहे
पेपाल खाते म्हणजे काय?ते कसे मिळवायचे याची सविस्तर माहिती मी फार पूर्वी दोन लेखांमध्ये दिलेली आहे.ती तुम्ही या दुव्यांवर वाचू शकता.
तुमचे पेपाल खाते कसे तयार कराल?
तुमच्या पे पाल खात्याची पडताळणी कशी कराल?
४)हे खाते जोडण्यासाठी तुमच्या अॅपच्या सेटिंग्ज मध्ये जा आणि तुमच्या पेपाल खात्याचा इमेल जोडून पडताळणी पूर्ण करा.
५)एकदा का ही पडताळणी पूर्ण झाली की तुमच्या छायाचित्राच्या विक्रीमधून मिळणारा पैसा जो डॉलर्स मध्ये असतो तो आपोआप तुमच्या बँक खात्यात जमा होतो.
६)आता मॅनेज फोटोज्स पर्यायावर टिचकी देवून तुमची छायाचित्र अपलोड करा.
७)यापुढे जेव्हा जेव्हा तुमच्या छायाचित्राची विक्री होईल तेव्हा तेव्हा पैसे आपोआप तुमच्या बँक खात्यात जमा होतील.अश्या प्रकारे तुमच्या छायाचित्रणाच्या छंदातून तुम्ही घर बसल्या पैसे कमावू शकता.
धन्यवाद!
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर
0 comments:
Post a Comment