मित्रमंडळी,
तुमच्या वेबसाईटसाठी योग्य रंगसंगती कशी निवडावी?याची माहिती आज आपण करून घेणार आहोत.जेणेकरून वेबसाईट डिजाईन करताना रंगसंगती तुम्हाला कोणतीही अडचण येणार?
हे कसे कराल?
तुमची वेबसाईट बनवताना जर योग्य रंगसंगती वापरली नाही तर ती तितकी आकर्षक दिसत नाही.असे होवू नये आणि तुम्हाला अधिकाधिक आकर्षक रंगसंगती वापरून वेबसाईट सुंदर बनवता यावी
यासाठी प्रथम खाली दिलेली लिंक तुमच्या वेब ब्राउजर मध्ये उघडा.
http://www.colorcombos.com/
जे नवीन पान उघडेल त्यावर तुमच्या वेबसाईट साठीजी रंगसंगती योग्य वाटेल ती निवडायची सोय केलेली असेल.
समजा तुम्हाला एखाद्या वेबसाईट वर वापरलेले रंग आवडले आणि ते नेमके कोणते हे बघायचे असेल तर त्यासाठी सुद्धा पर्याय उपलब्ध आहे.
उदा. तुम्हाला माझ्या ब्लॉगसाठी कोणती रंगसंगती वापरली आहे हे बघायचे असेल तर तुम्ही वर दिलेली लिंक उघडा.
कोप-यात चित्रात दाखविल्या प्रमाणे पर्याय दिसेल त्यात माझ्या ब्लॉगचा पत्ता लिहा आणि इंटर वर टिचकी द्या.
जे पान उघडेल त्यावर मी माझ्या ब्लॉगच्या निर्मीतीसाठी जे रंग वापरले आहेत त्याची माहिती मिळेल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
thank for this information
ReplyDeleteNice Information....
ReplyDelete