मित्रमंडळी,
१४नोव्हेबर २०१६ रोजी चंद्र हा पृथ्वीच्या खूपच जवळ आला होता,त्यामुळे तो आकाराने मोठा दिसत होता.इंग्रजी मध्ये यालाच सुपरमून असे म्हणतात.२६ जानेवारी १९४८ नंतर प्रथमच चंद्र पृथ्वीच्या इतक्या जवळ आला होता हे या दिवसाचे वैशिष्ट आहे. आणि परत एकदा चंद्र पृथ्वीच्या इतक्या जवळ यायला २५ नोव्हेबर २०३४ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.त्यामुळे मी आवर्जून या घटनेचा साक्षीदार व्हायचे ठरवले आणि या चंद्रदर्शनाची छायाचित्र तर घेतलीच पण चलचित्र सुद्धा बनवून ठेवले.म्हणजे एक आठवण सुद्धा राहील आणि ज्यांना हे पाहता आले नाही त्या मित्रमंडळीना ही घटना पाहता येईल,हाच यामागे उद्देश होता.
या घटनेचे मी रेकोर्ड केलेले चलचित्र:
मी काढलेली काही निवडक छायाचित्रे:
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment