आज आपण जाणून घेणार आहोत की ३६० डिग्री व्हिडीओ म्हणजे नेमके काय असते? आणि एका सामान्य व्हिडीओ आणि ३६० डिग्री व्हिडीओ यांच्या मध्ये नेमका काय फरक असतो?
सामान्य व्हीडोओ जेव्हा आपण रेकोर्ड करतो तेव्हा असा कॅमेरा वापरतो जो फक्त समोरच्या बाजूंला किंवा उजवीकडे,डावीकडे जिथे आपण कॅमेराची लेन्स घेवून जावू त्याभागाचे रेकोर्डिंग करतो.३६० डिग्री व्हिडीओ बनवण्यासाठी अश्या प्रकारचा कॅमेरा वापरलेला असतो जो कॅमेराच्या चारी बाजूला,वरती,खाली, जे जे दिसेल ते सर्व रेकॉर्ड करतो.आणि असा कॅमेरा
वापरून जो व्हिडीओ बनतो तो बघताना असे वाटते की आपण त्या ठिकाणीच आहोत.म्हणजे उजवीकडे
डावीकडे,वर,खाली कुठेही पाहिलं की त्या ठिकाणच दृश्य आपल्याला दिसते.यालाच ३६० डिग्री व्हिडीओ असे
म्हणतात.
हे व्हिडीओ रेकॉर्ड कसे करायचे?
हे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी बरेच प्रकार पर्याय उपलब्ध आहेत.
त्यातला पहिला प्रकार म्हणजे:
१)स्वत:ची कॅमेरा फ्रेम वापरून:
या प्रकारात आपल्या गरजे नुसार चार,आठ,बारा,सोळा कॅमेरे अडकवले जातातआणि त्यातून व्हिडीओ रेकॉर्ड केला जातो,
यानंतर हे सर्व व्हिडीओ जोडले जातात.त्यासाठी ३६० डिग्री व्हिडीओ एडिटिंग सोफ्टवेअर वापरले जाते.
बहुतेक वेळा यासाठी गो प्रो हा अमेरिकन कॅमेरा ब्रांड वापरला जातो.
२)या व्यतिरिक्त स्वस्त पर्याय म्हणजे रिको थिटा कॅमेरा,
एल्जी ३६० डिग्री कॅमेरा
अथवा सैमसंग गियर ३६०
अथवा कोडेक पिक्सप्रो कॅमेरा
हे वापरून तुम्ही स्वत:चे ३६० डिग्री व्हिडीओ सहज बनवू शकता.हे वापरण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची एडिटिंग करावी लागत नाही,कॅमेरा स्वत: सर्व रेकॉर्ड करून ३६० डिग्री व्हिडीओ बनवून देतो.
हे व्हिडीओ अपलोड कुठे कराल?
युट्युबने ३६० डिग्री अपलोड करण्यासाठी अथवा त्याची लाइव्ह ब्रॉडकास्टिंग करण्यासाठी सुविधा ३६० डिग्री वाहिनी मार्फत दिलेली आहे.
https://www.youtube.com/channel/UCzuqhhs6NWbgTzMuM09WKDQ
जिथे ३६० डिग्री व्हिडीओ सोबतच व्हर्चुअल रियालिटीचे व्हिडीओ पाहण्याची आणि अपलोड करण्याची सोय केलेली आहे.
हे व्हिडीओ तुम्ही तुमच्या संगणकाच्या पडद्यावर माउसने कंट्रोल हालवून,३६० डिग्री व्हिडीओना सपोर्ट करणा-या मोबाईलमधून(जायरोस्कोप असलेले मोबाईल),किंवा व्हर्चुअल रियालिटी हेडसेट(याची माहिती आपण पुढील भागात घेवूच) वापरून पाहू शकता
३६० डिग्री व्हिडीओचे उदाहरण मी खाली दिलेले आहे.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment