नमस्कार मंडळी,
जवळपास ५ महिण्यापूर्वी मी साधा डीएसएलआर कॅमेरा वापरून एक शॉर्टफ्लिम बनवली होती.काही कारणास्तव वेळे अभावी तो दुवा सर्वांसाठी खुला करण्याची संधीच मिळाली नाही.कथा,कविता,चारोळी संग्रह असे लिखाण मी याआधी केलेले आहे,मी जवळपास आठ वर्षा पूर्वी लिहिलेली एक प्रेमकथा चलचित्ररुपात यावी अस मला वाटत होत.ही कथा या ठिकाणी वाचता येईल.
बघितलस,आज खुप आठवते आहेस,सगळं विसरुन सुद्धा....
पण त्यावेळी कोणाचा पाठींबा नव्हता,ना ओळख होती(आताही नाहीच आहे,पण पहिल्यापेक्षा स्वत:च्या जीवावर गोष्टी करायची सवय अंगवळणी पडल्यामुळे परिस्थिती पूर्वीपेक्षा बरी आहे,म्हणजे मी करू शकतो हा विश्वास आहे) आणि मुख्य म्हणजे इंटरनेटमुळे जग तितकस जवळ आल नव्हत (निदान आपल्या देशात तरी).
आज इन्टरनेटचा स्पीड वाढला आहे,रेट कमी होत आहेत,त्यामुळे मोठ्या आकाराच्या फाईल्स युट्युब वर,फेसबुक वर अपलोड करण आणि अगदी गावागावापर्यंत मोबाईल नेट पोहोचल्यामुळे तळागाळापर्यंत आपल काम पोहोचवण आता सहज शक्य झाल आहे.
म्हणून ही कथा मी चलचित्र रुपात प्रदर्शित करायचं ठरवलं.तुम्हाला ऐकायला कदाचित आश्चर्य वाटेल, पाच रुपये ही खर्च न करता मी साधा डीएसएलआर कॅमेरे (तेसुद्धा मित्रांनी दिलेले) वापरून हे चित्रीकरण केले,यात कलाकार सुद्धा या आधी कधीही अभिनय न केलेले आहेत आणि काही घरातील सदस्यांना सुद्धा छोट्या भूमिका करायला दिल्या आहेत.म्हणजे सर्व काही सर्वांसाठी नवीनच (माझ्यासाठी सुद्धा) :-)
कारण मी, शुटींग,संवाद लिखाण,व्हाईसओव्हर,एडिटिंग याचे कुठलेही रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही आणि खरंतर हे माझ क्षेत्र ही नाही.साधा संगणक आणि हेडफोन,माईक आणि व्हाईसओव्हर करताना संवादाचा सीन सोबत टायमिंग साधला जावा यासाठी सेकंद मोजण्यासाठी मोबाईल यांचा वापर मी केलेला आहे.हे सर्व कस करायचं त्याचा सविस्तर लेख मी लिहीनच,म्हणजे तो असा प्रयोग करणा-यांना उपयोगी पडेल.
भविष्यात आणखी शॉर्टफिल्म बनविन,काय भरोसा या अनुभवाचा उपयोग होऊन एक मोठा चित्रपट सुद्धा बनविन.तुमचे आशीर्वाद आहेतच सोबतीला.
ही शॉर्टफ्लिम बनवताना मी वापरलेल्या गोष्टी:
१)कॅनोन ६०० डी(विशेष आभार:सचिन परब)
२)निकॉन कुलपिक (विशेष आभार:प्रशांत कुडतरकर)
३)संगणक
४)हेडफोन माईक सोबत
५)युटूब कडून दिले जाणारे मोफत म्युजिक
कलाकार :
प्रशांत कुडतरकर (मोठा नायक)
शुभम गावडे (तरुणपणीचा नायक )
पूजा वारखणकर(नायिका)
साई सावंत(नायिकेचा भाऊ)
दामोदर रेडकर(नायिकेचे वडील)
रंजना रेडकर(नायिकेची आई)
प्रसाद रेडकर (नातेवाईक)
कॅमेरा,संवाद लिखाण,एडिटिंग,व्हाईसओव्हर:
प्रशांत दा.रेडकर
येत्या दोन दिवसात,ही शॉर्टफ्लिम फेसबुक वर अपलोड करून HD दर्जाची युट्युब लिंक जी सध्या प्रायव्हेट आहे, ती सर्वाना पाहता यावी यासाठी खुली करण्यात येईल.
पुढे या प्रकारचे कवितांचे व्हिडीओ आणि शॉर्टफ्लिमची युटूब सिरीज बनवण्याचा मनात विचार सुरु आहे.
धन्यवाद,
तुमचा मित्र,

शॉर्ट फिल्म बनवली आहे तर लिंक का नाही दिली, नक्की बनवली आहे का
ReplyDeleteप्रत्येक बाबतीमध्ये संशय घ्यायची वृत्ती माणसाला रसातळाला घेवून जाते.तुमची ही टिप्पणी 9 तारखेची आहे आणि मला वाटते जर या ब्लॉगवरच्या पोस्ट नीट पाहिल्यात तर मी याच दिवशी ५ तारखेला ब्लॉग वर ती पोस्ट केलेली आहे.
Deletehttp://www.prashantredkar.com/2016/09/blog-post_5.html
खरतर ही कॉमेंट मी पब्लिश होवू दिली नसती तर कोणाला कळलेही नसते,पण तुमच्या सारख्या खोचक आणि न बघताच टिप्पणी करणा-याना उत्तर देणे जरुरी आहे.ते मी करतो आहे.
धन्यवाद!