मित्रमंडळी,
आज आपण युट्यूब वापरून स्क्रीनकास्ट कसे कराल याची माहिती करू घेणार आहोत.त्याआधी स्क्रीनकास्ट करणे म्हणजे काय ते जाणून घेवू या.स्क्रीनकास्ट करणे म्हणजे तुमच्या संगणकाकाच्या स्क्रीन वर दिसणा-या हालचाली रेकॉर्ड करणे.ज्यांना संगणकाशी संबंधित टीटोरील्स बनवायच्या असतात त्यांच्या साठी हे फार उपयोगी आहे.त्यासाठी बरीच मोफत आणि पैसे देवून खरेदी करावी अशी software उपलब्ध आहे.याची माहिती आपण आधीही घेतलेली आहे.पण ब-याच जणांना हे माहित नसेल,की केवळ युट्यूब वापरून आपण हे स्क्रीनकास्ट करू शकतो,म्हणजे सोप्प्या भाषेत संगणकाच्या स्क्रीन वरील हालचाली रेकोर्ड करून त्याचा व्हीडीओ प्रकाशित करणे.हीच पद्धत वापरून आपण live ब्रॉडकास्टिंग सुद्धा करू शकतो.
हे कसे कराल?
1)प्रथम तुमचे गुगल खात्याचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून तुमच्या युट्युब खात्यावर प्रवेश करा.
https://www.youtube.com/
२)प्रवेश केल्यावर तुम्हाला वर कोप-यामध्ये upload पर्याय दिसेल त्यावर टिचकी द्या.
3)पुढच्या पानावर तुम्हाला Live streaming नावाचा पर्याय्र दिसेल.
त्याच्यावर "Get Started" असे लिहिलेले असेल.त्याच्यावर टिचकी द्या.
४)आता जे पान उघडेल त्यावर बाजूच्या साईडबारमध्ये Event नावाचा पर्याय दिसेल त्यावर टिचकी द्या.
५)आता ही तुमची पहिलीच वेळ असल्यामुळे तुम्हाला LIVE EVENT साठी LIVE STREAMING सुरु करावे लागेल.चित्रात दाखवल्याप्रमाणे Enable Live Streaming पर्यायावार टिचकी देवून तो सुरु करा.
६)आता तुमच्या खात्याची सत्यता पडताळण्यासाठी गुगल व्हेरिफिकेशन करायला सांगेल.चित्रात दाखवल्याप्रमाणे ते करून घ्या.
जर तुम्हाला स्क्रीनकास्ट करायचे असेल तर privacy >>Unlisted ठेवावी लागेल म्हणजे ती रेकोर्डिंग कोणाला दिसणार नाही. आणि जर तुम्हाला live Broadcasting करायचे असेल तर Event प्रायवेसी Public ठेवावी लागेल.
सर्व सेटिंग करून झाल्यावर Go Live वर टिचकी द्या.
या नन्तर जर तुम्हाला स्क्रीनकास्ट म्हणजे रेकॉर्डिंग करायची असेल तर Start Screenshare वर टिचकी देवून तुमची स्क्रीन तुम्हाला निवडावी लागेल.
यानंतर Start Broadcast
वर टिचकी देवून तुम्हाला रेकॉर्डिंग सुरु करावी लागेल.अश्या प्रकारे
तुमच्या स्क्रीन वर जे काही घडेल ते सर्व रेकॉर्ड होईल,पण हे प्रायवेट सेशन
असल्यामुळे कोणाला दिसणार नाही.रेकॉर्डिंग संपल्यावर तुम्हाला प्रथम Stop Screenshare पर्याय वापरावा लागेल.यानंतर Stop Broadcast पर्याय वापरून रेकोर्डिंग थांबवावी लागेल.आता रेकॉर्ड केलेला व्हिडीओ तुमच्या मनासारखा झाला अस तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही https://www.youtube.com/dashboard या लिंक वर जावून प्रायवेसी मध्ये Unlisted >>Public असा बदल करून सेव्ह केल्यावर हे स्क्रीन कास्ट सर्व जनरल पब्लिकसाठी खुले होईल.
स्क्रीनकास्ट कसे करावे याचे उदाहरण मी केलेली एक चाचणी पाहून लक्षात येईल
जर तुम्हाला live ब्रॉडकास्टिंग करायचे असेल तर तुम्हाला Start Screenshare हा पर्याय वापरावा लागणार नाही. वरील सर्व पाय-या वापरून फक्त Start Broadcastआणि सेशन संपल्यावर Stop Broadcast हे दोनच पर्याय वापरावे लागतील.
अश्या प्रकारे आज आपण स्क्रीन कास्ट आणि live ब्रॉडकास्टिंग कशी करायची याची माहिती घेतली.
धन्यवाद!
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment