मित्रमंडळी,
आता युट्यूब वर दीर्घ वेळेचे चलचित्र अपलोड करणे शक्य आहे,पण त्यामुळे काय होतंय?समजा आपल्याला त्या युट्यूब व्हिडिओचा ठराविक वेळेनंतरचा व्हिडीओ उदा. ३० मिनिटाच्या व्हीडीओ मधला १५ मिनिटचा महत्वाचा भाग दाखवायचा असेल तर संपूर्ण व्हिडीओ सुरुवातीपासून पहावा लागतो,यात वापरकर्त्याच्या वेळेचा अपव्यय होतो आणि त्याचा इन्टरनेट वापराचा डेटा सुद्धा फुकट जातो,हे टाळण्यासाठी,आज आपण व्हिडिओचा ठराविक भाग इम्बेड कसा कराल? याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम तुम्हाला जो युट्यूब व्हिडिओ तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये,वेबसाईटवर इम्बेड करायचा आहे अथवा फेसबुक,ट्विटरवर पोस्ट करायचा आहे त्याची लिंक वेबब्राउजरमध्ये उघडा.
उदा: ही व्हिडीओ लिंक https://www.youtube.com/watch?v=dB1lfqJtLBQ
ज्यात ४:४७ मिनिटांची एका कार्यक्रमा दरम्यानची रेकोर्डिंग आहे,यातला सुरुवातीचा काही मिनिटाचा भाग वगळून,सावनीच्या गाण्याला जिथून सुरुवात होते तो भाग मला पोस्ट करायचा आहे.
हे करण्यासाठी मी ती लिंक वेबब्राउजर मध्ये उघडतो.
२)त्या युट्युब व्हिडीओचा प्लेटाईम दाखवणारा जो टाइमबार आहे तो माउसच्या मदतीने १:२० मिनिटापर्यंत सरकवतो आणि मग राईट क्लिक करून "Copy video URL at current time" हा पर्याय वापरून नवीन लिंक कॉपी करून घेतो आनि मग ती नवीन लिंक फेसबुक अथवा ट्विटरवर पोस्ट करतो जेणेकरून आधीचा १:२० मिनिटाचा भाग वगळून व्हिडीओ तिच्या गाण्यापासून सुरु होईल.
उदा https://youtu.be/dB1lfqJtLBQ?t=81
हे झाल फेसबुक,ट्विटर वर लिंक पोस्ट करण्या बद्दल,हेच तुम्हाला तुमच्या ब्लॉग अथवा वेबसाईट वर करायचे असेल तर तुम्हाला ही लिंक इम्बेड करावी लागेल
ते करण्यासाठी खाली दिलेला कोड कॉपी करून तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये पोस्ट करा आणि हे करताना COMPOSE च्या बाजूला जो HTML पर्याय आहे तो क्लिक करावा लागेल मगच हे कोड पेस्ट करून बदल सेव्ह करा.या कोड मध्ये dB1lfqJtLBQ?t=81 च्या जागी तुम्ही जी नवीन युट्यूब लिंक कॉपी केलेली आहे तिचा शेवटचा भाग समाविष्ट करा https://youtu.be/"dB1lfqJtLBQ?t=81"< हा भाग
असे केल्यावर तुम्हाला तो व्हिडीओ आवश्यक असलेल्या वेळेपासून तुमच्या पोस्टमध्ये समाविष्ट झालेला दिसेल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
0 comments:
Post a Comment