मित्रमंडळी,
आज आपण "तुमच्या फेसबुक प्रोफाईल वरून लाइव्ह ब्रॉडकास्टिंग कशी कराल? "याची माहिती करून घेणार आहोत.याआधी लाइव्ह ब्रॉडकास्टिंग म्हणजे एखाद्या घटनेचे,स्वत:चे अथवा कार्यक्रमाचे लाइव्ह चित्रीकरण करून ते फेसबुक वर दाखवायची सुविधा फक्त फेसबुक पेजसाठी उपलब्ध होती,म्हणजे त्याचा वापर करून कलाकार,नेते आपल्या चाहत्यांशी संवाद साधून लाइव्ह गप्पागोष्टी करू शकत होते,पण आता हीच सुविधा सामान्य प्रोफाईल वर उपलब्ध झालेली आहे.निदान सध्या मी तरी ही सुविधा माझ्या प्रोफाईल वर वापरतो आहे.
ही सुविधा कशी वापराल?
१)सर्व प्रथम तुमच्या मोबाईल वर असलेले फेसबुक अॅप उघडा.
२)लिहून पोस्ट करण्यासाठी त्या पर्यायावर टिचकी द्या.
३)आता तुम्हाला मोबाईल स्क्रीनवर दिसणा-या विविध पर्यांयामध्ये "Go Live" नावाचा पर्याय दिसेल.
४)या पर्यायाचा वापर केल्यावर पुढची स्क्रीन खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे दिसेल.
यात "Describe your live video.."च्या जागी तुमच्या या लाइव्ह ब्रॉडकास्टिंगविषयीची माहिती द्या
उदा. गणेशाच्या आगमनाचे चित्रीकरण
यानंतर या लाइव्ह ब्रॉडकास्टिंगचा खाजगीपणा ठरवा म्हणजे पब्लिक की फ्रेंड्स
वरती कोप-यात जो गोल आकार दोन बाणांच्या चिन्हांसोबत दिसत आहे त्यावर टिचकी देवून पुढचा की मागचा कॅमेरा वापरून लाइव्ह ब्रॉडकास्टिंग करायचे ते ठरवा.
यानंतर Go Live पर्याय वापरून तुमचे लाइव्ह ब्रॉडकास्टिंग सुरु करा. स्क्रीनवर ३ अंक मोजून झाल्यावर तुमचे लाइव्ह ब्रॉडकास्टिंग सुरु होईल आणि ते तुमच्या "फेसबुक प्रोफाईलवर" तुमच्या मित्रमंडळीना दिसू लागेल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर

0 comments:
Post a Comment