५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )
नमस्कार मंडळी,
सोप्प्या भाषेत सांगायचे तर, दृकश्राव्य माध्यमांचा वापर करून जेव्हा कृती करून एखादी गोष्ट दाखविली अथवा शिकवली जाते तेव्हा त्याला व्हिडीओ ब्लॉगिंग म्हणतात!समजा तुम्हाला एखादी गोष्ट कशी करायची याची कृती समोरच्याला दाखवायची असेल तर त्याचे प्रभावी माध्यम म्हणजे दृकश्राव्य माध्यमांचा वापर करून तयार केलेला व्हिडीओ,जो तुम्ही फेसबुक,युट्युब वर अपलोड करून इतरांसोबत सहज शेअर करू शकता.यातही प्रकार आहेत,पण त्यातल्या त्यात सोप्पी पद्धत आहे ती म्हणजे स्क्रीन रेकॉर्डिंग.संगणकाच्या पडद्यावर घडणा-या हालचाली रेकॉर्ड करून त्या चलचित्र स्वरूपात अपलोड करणे आणि शेअर करणे.यासाठी लागणारे साहित्य सुद्धा खूप कमी आणि सहज उपलब्ध होणारे आहे, याबद्दल मी पुढच्या काही लेखात सविस्तर लिहिणार आहेच.याचेच एक प्रात्यक्षिक मी खाली दिलेल्या चलचित्रात दाखवले आहे.यात माझी अनुदिनी कशी वापरायची याची एक झलक आहे.
मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.
1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.
**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.
कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट
४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे
0 comments:
Post a Comment