नमस्कार मित्रमंडळी,
यापुढे नवीन प्रयोग म्हणून मराठी मधून व्हिडिओ ब्लॉगिंग करण्याचा विचार मनात आला आहे.६-७ वर्षापूर्वी तशी सुरुवात मी केली होती,पण त्यावेळी ब्रॉडबँड इन्टरनेट प्रत्येकासाठी सहजगत्या उपलब्ध नव्हते.पण आता काळ बदलला आहे,स्थानिक पातळीवर घराघरात इन्टरनेट उपलब्ध होवू लागलेले आहेच. पण त्याच बरोबर स्मार्टफोनचा वापर वाढल्यामुळे आणि ३जी तसेच ४जी सेवा उपलब्ध होवू लागल्यामुळे वेबब्राउजिंगचा स्पीड वाढला आहे.तसेच युट्यूब वर व्हिडीओ पाहण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे प्रत्यक्ष कृती दृक्श्राव्य स्वरूपात दाखवता आली तर ते जास्त परिणामकारक ठरते,म्हणूनच व्हिडिओ ब्लॉगिंगची सुरुवात करत आहे.
धन्यवाद,
आपला मित्र,
प्रशांत दा.रेडकर
नमस्कार,
मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.
1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.
**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.
कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट
४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे
savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra
धन्यवाद :-)
0 comments:
Post a Comment