मित्रमंडळी,
इंटरनेट म्हटले की इथे बरे वाईट सर्व प्रकारचे लोक आले,त्यामुळे तुम्ही ब्लॉग वर लिहिलेले तुमचे लिखाण चोरी करण्यासाठी बरेच लोक टपलेले असतात..खरतर rss फीड्सचा उपयोग तुमच्या ब्लॉगच्या पोस्ट
तुमच्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जातो.पण काही कॉपी बहाद्दूर तुमच्या ब्लॉगच्या याच सुविधेचा उपयोग त्यावरील संपूर्ण लेख,स्क्रिप्ट वापरून त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यासाठी वापरतात.
त्यामुळे आज आपण, तुमच्या ब्लॉगमधला rss फीड्स हा पर्याय कसा बंद कसा करावा अथवा त्यावर थोडे निर्बंध कसे घालावे?जेणेकरून तुमची संपूर्ण पोस्ट ते कॉपी करू शकणार नाहीत. याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१) प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर प्रवेश करा.
२)यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या ब्लॉगच्या rss फीड्स बंद करायच्या आहेत त्या ब्लॉगच्या सेटिंग्जमध्ये जा.
Settings >> Others >> Site Feeds >> Allow Site Feeds >>
३)आता तुमच्या कडे दोन पर्याय उपलब्ध आहेत
*जर तुम्हाला संपूर्ण rss फीड्स बंद करायच्या असतील तर Site feed>>Allow Blog Feed पर्यायातून Noneनिवडा.(असे केल्याने कॉपी करणा-याला स्क्रिप्ट वापरून तुमचे संपूर्ण लिखाण कॉपी करता येणार नाही.)
*जर तुम्हाला rss फीड्स आंशिक स्वरूपात दाखवायच्या असतील तर Until Jump Break अथवा Short पर्यायाची निवड करा.(असे केल्याने कॉपी करणा-याला स्क्रिप्ट वापरून तुमच्या लिखाणाचा "पुढे वाचा" अथवा सुरुवातीचा एक परीच्छेद इतकेच लिखाण कॉपी करता येईल आणि पुढे वाचण्यासाठी त्याच्या साईट वरील वाचकाला तुमच्या ब्लॉग वर येणे भाग पडेल.)
४)केलेले बदल जतन करण्यासाठी Save Settings पर्यायावर टिचकी द्यायला विसरू नका.
धन्यवाद
0 comments:
Post a Comment