मित्रमंडळी,
अँड्रॉइड फोन वापरून mp3 रेकॉडिंग कसे कराल? आणि ते शेअर कसे कराल याची माहिती आपण आता करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)हे करण्यासाठी प्रथम तुमच्या अँड्रॉइड फोनवर गुगल प्ले स्टोर इंस्टाल असणे गरजेचे,त्याच प्रमाणे wifi अथवा नेटपॅक वपरून तुमच्या मोबाईल वर इंटरनेट सेवा उपलब्ध हवी.
२)आता तुमच्या मोबाईलमधून गुगल प्ले स्टोर उघडा.
https://play.google.com
आणि Hi-Q MP3 Voice Recorder या appचा शोध घ्या.
मग ते तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टाल करा.
३)आता तुमच्या मोबाईल मध्ये ते उघडा आणि चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे कृती करा.
४)रेकोर्डिंगसाठी बिट रेट निवडा.
५)मग रेकोर्ड बटनला स्पर्श करून रेकोर्डिंग सुरु करा.फ्री वर्जन मध्ये तुम्ही १० मिनिटांची रेकोर्डिंग करू शकता.रेकोर्डिंग करून झाल्यावर stop बटनला स्पर्श करून रेकोर्डिंग बंद करा.तुमची रेकोर्डिंग आपोआप सेव्ह होईल.
६)रेकोर्डिंग करून झाल्यावर चित्रात दिसणा-या मेनू प्रमाणे असलेल्या मेनू वर क्लिक करा.
मग हवे ते रेकोर्डिंग निवडा.
प्ले बटनला स्पर्श करून रेकोर्डिंग कशी झाली आहे ते पहा..अथवा रिनेम पर्याय वापरून नवीन नावाने जतन करा.
७)शेअर अॅण्ड सेंड पर्याय वापरुन तुम्ही हे रेकोर्डिंग ब्लूटूथ,वायफाय,इमेल,जीमेल,मेसजींग,whatsapp,वायफाय ट्रान्स्फर पर्यायाने इतरांसोबत शेअर करू शकता अथवा तुमच्या संगणकावर पाठवू आणि साठवू शकता.
धन्यवाद
0 comments:
Post a Comment