मित्रमंडळी,
आज आपण तुमचे एकच गुगल खाते वापरून एका पेक्षा जास्त युट्युब वाहिन्या(चॅनल्स) कश्या सुरु कराल?याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)हे करण्यासाठी प्रथम खाली दिलेला वेबपत्ता वेबब्राउजरमध्ये उघडा.
https://www.youtube.com/
२)मग साईन इन वर टिचकी द्या.
३)साईन इन केल्यावर तुमच्या खात्याशी जोडलेल्या युट्युब वाहिनीचे पान उघडेल.
४)आता कोप-यात तुमच्या खात्याचे चित्र दाखवणा-या गोल आकारावर टिचकी देवून आधी अस्तित्वात असलेल्या चॅनलच्या Creator Studio च्या बाजूला असलेल्या Youtube Settings पर्यायावर टिचकी द्या.
५)आता जे पान उघडेल त्यांच्या तळाला Additional features मध्ये तुम्हाला Create a new channel नावाचा पर्याय दिसेल त्यावर टिचकी द्या.
६)चॅनलचे नाव,विभाग निवडून I agree to the Pages Terms समोरचा चेकबॉक्स चेक करा आणि मग Done वर टिचकी द्या.
७)असे केल्याने तुमचा आणखी एक युट्युब चॅनल तयार होईल आणि आता ह्या दोन्ही चॅनल्सवर एकच गुगल खाते वापरून तुम्ही प्रवेश करू शकाल,त्याच प्रमाणे विषयाप्रमाणे वेगवेगळे व्हिडीओ त्या त्या चॅनल्सवर पोस्ट करू शकाल.
८)आता चॅनल सेटिंगमध्ये बदल करण्यासाठी Creator Studio पर्यायावर टिचकी दिल्यावर चॅनल पर्याय निवडून Status and features पर्यायावर टिचकी देवून तुम्ही तुमच्या युट्युब चॅनलची पडताळणी करू शकता
त्यासाठी verify पर्यायावर टिचकी द्या..आणि तुमचा मोबाईल नंबर वापरून तुमच्या खात्याची पडताळणी करा.
९)या चॅनलवरील व्हिडिओमध्ये गुगलच्या जाहिराती दाखवण्यासाठी आणि १५ मिनिटापेक्षा जास्त वेळाचे व्हिडिओ अपलोड करता यावे यासाठी अथवा लाईव्ह इवेन्टच्या प्रक्षेपणासाठी, Enable वर टिचकी देवून तुमचा मोबाईल नंबर वापरून तुमच्या खात्याची पडताळणी करा.
धन्यवाद.
0 comments:
Post a Comment