मित्रमंडळी,
एकदा वाचून झाल्यावर आपोआप डिलीट होणारे नोट्स ऑनलाईन कसे लिहाल आणि शेअर कराल?याची आज आपण माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
1)प्रथम खाली दिलेला वेब पत्ता तुमच्या वेब ब्राउजर मध्ये उघडा.
https://privnote.com/
२) Write your note below पर्यायाखाली तुम्हाला हवे लिखाण करा आणि मग "Create note" बटन वर टिचकी द्या.
३)आता जी लिंक उघडेल त्यावरील नोट्सची लिंक कॉपी करा आणि ज्याना नोट्स पाठवायचे असेल त्यांना पाठवा.
४)समोरच्या व्यक्तीने ते वाचून झाल्यावर वेब ब्राउजर बंद केला किंवा ती लिंक पुन्हा उघडायचा प्रयत्न केला की लिंकवरचे लिखाण आपोआप नष्ट केले जाईल
धन्यवाद !
नमस्कार,
मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.
1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.
**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.
कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट
४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे
savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra
धन्यवाद :-)
0 comments:
Post a Comment