मित्रमंडळी,
तुमच्या घरातील अथवा ऑफिसमधील संगणकावरून तुमच्या मित्राचा अथवा ओळखीच्या कोणाचाही संगणक त्यांच्या संगणकावरील समस्या सोडवण्यासाठी कसा वापरायचा याची आपण आज माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
हे करण्यासाठी तुमचा संगणकावर इंटरनेटची जोडणी असणे गरजेचे आहे.
आता खाली दिलेल्या वेबसाईट वरून TeamViewer नावाचा प्रोग्राम डाउनलोड करून घ्या.
https://www.teamviewer.com/hi/index.aspx
त्यासाठी साईट उघडल्यावर Start Full Version It's Free!
पर्याय वापरून सेटअप फाईल डाउनलोड करा मग त्या .exe फाईल वर क्लिक करून तो प्रोग्राम तुमच्या संगणकावर प्रस्थापित करा.(चित्र पहा)
ज्या व्यक्तीचा संगणक तुम्हाला हाताळायाचा आहे त्याच्या संगणकावर सुद्धा हा प्रोग्राम इंस्टाल करणे गरजेचे आहे.
प्रोग्राम इंस्टाल करून झाल्यावर तुमच्या मित्राचा Yours Id आणि पासवर्ड विचारून घ्या आणि तो Control Remort Computer या शीर्षकाखाली दिसणा-या Partner ID च्या जागी मित्राचा Id लिहा.
मग connect to partner पर्यायावर क्लिक करा.
तुमच्या दोघांच्याही ही संगणकावर इंटरानेट सेवा उपलब्ध असेल तर तुमच्या मित्राच्या संगणकाशी तुमचा संगणक जोडला जाईल आणि तुमच्या मित्राने तो वापरायची परवानगी दिल्यावर त्यांच्या संगणकाची स्क्रीन तुमच्या संगणकाच्या स्क्रीन वर दिसू लागेल.
मग तुम्ही तुमच्या संगणकावरून त्याच्या संगणकावरील कोणतीही गोष्ट उदा.फाईल,चित्र इत्यादी उघडून पाहू शकता.
या व्यतिरिक्त फाईल पाठवण्यासाठी अथवा मिटिंगसाठी सुद्धा तुम्ही TeamViewer या प्रोग्रामचावापर करू शकता.
धन्यवाद.
0 comments:
Post a Comment