मित्रमंडळी,आज आपण आयफ्रेमचा तुमच्या ब्लॉगमध्ये कसा वापर करायचा? याची माहिती करून घेणार आहोत.आयफ्रेमचा वापर करून आपण तुम्हाला हवे असलेली कोणतीही वेबसाईट अथवा त्यावरचे पान तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये समाविष्ट करू शकता.
कृती:
त्यासाठी तुमच्या ब्लॉगर ब्लॉगमध्ये न्यू पोस्ट पर्याय निवडून html पर्यायवर टिचकी द्या.
या नंतर खालील कोड कॉपी करून तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये पेस्ट करा
<iframe src="http://savaniravindra.blogspot.in/" style="border:none; width:100%"></iframe>
यात width आणि height तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे बदलू शकता.
याठिकाणी असलेल्या http://savaniravindra.blogspot.in या ब्लॉगपत्त्याच्या जागी तुम्ही तुम्हाला हवा असलेला ब्लॉग अथवा वेबसाईटचा पत्ता समाविष्ट करू शकता.असे केल्यावर तुमची पोस्ट पब्लिश करा मग ती तुम्हाला खालील प्रमाणे दिसेल,जसा तुम्हाला इथे माझ्या बहिणीची माहिती असलेला ब्लॉग दिसत आहे.
नमस्कार,
मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.
1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.
**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.
कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट
४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे
savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra
धन्यवाद :-)
0 comments:
Post a Comment