तुमच्या वेबसाईटसाठी ५ जीबीची वेब होस्टिंग मोफत कशी मिळवाल? आणि त्यावर वेबसाईट होस्ट कशी कराल?याची माहिती आज आपण करून घेणार आहोत.
(हा लेख या विषयाची थोडीबहुत माहिती असणा-यांसाठी आहे.)
मित्रमंडळी,वेबसाईट इंटरनेटवर दिसावी यासाठी आवश्यक असणा-या फाईल्स वेब होस्टिंग खात्यावर अपलोड कराव्या लागतात. तरच तुमच्या डोमेनला आवश्यक असलेल्या फाईल्स उपलब्ध होतात आणि साईट इंटरनेटवर दिसते.
आज आपण अश्या वेबहोस्टिंग कंपनीची माहिती घेणार आहोत जी ५ जीबीचा स्टोरेज मोफत तर देतेच या व्यतिरिक्त तुम्हाला php,sql database सपोर्टसुद्धा मोफत देते.या शिवाय तुम्ही या खात्यावर दोन डोमेन ठेवू शकता.
हे कसे कराल?
१) प्रथम खाली दिलेल्या लिंक वर जा आणि नाव नोंदणी करा.
http://5gbfree.com/sign-up.php
२)खाते तयार झाल्यावर आवश्यक पासवर्ड तुम्हाला मेल केला जाईल
३)यानंतर खाली दिलेल्या लिंक वर जावून लॉग इन करा
http://5gbfree.com/login/
४)प्रवेश केल्यावर तुम्हाला तुमच्या साईटसाठी cpanel खालील प्रमाणे दिसेल.
५) आता File Manager पर्यायावर टिचकी द्या.मग वेब रूट पर्याय निवडून Go पर्यायावर टिचकी द्या.
८)आता अपलोड झाले ल्या zip फाईलवर राईट क्लिक करून Extract पर्यायावर टिचकी देवून सर्व फाईल्स unzip करून घ्या.
९)unzip केलेल्या फाईल्स Move पर्यायाचा वापर करून Public_html फोल्डर मध्ये पाठवा.
सर्व पाय-या योग्य प्रकारे पार पडल्या तर तुमची वेबसाईट खालील प्रमाणे दिसू लागेल.
डेमो पाहण्यासाठी खाली दिलेल्या दुव्याचा वापर करा.
http://savanir.5gbfree.com/
वर्डप्रेस सारखी php आणि डेटाबेसचा सपोर्ट असलेले स्क्रिप्ट कशी वापरायची हे आधीच्या लेखात लिहिले आहे त्या साठी अनुदिनीच्या अनुक्रमणिका विभागात शोध घ्या.
धन्यवाद!
0 comments:
Post a Comment