काही माणसांचे आयुष्य किती वाईट असते,त्याना असे जगताना पाहिले की जगण्याची व्याख्या बदलावीशी वाटते.
मध्यंतरी प्रतीबालाजी मंदिरात जाण्याचा योग आला.अतिशय स्वच्छ परिसर,कुठेही घाणीचा लवलेश नव्हता.तिथल्या सार्वजिनक स्वच्छतागृहात जाण्याआधी पायातील पादत्राणे काढावी लागतात,मग वाहत्या पाण्यात पाय धुवून मगच स्वच्छतागृहात प्रवेश मिळतो.आत गेल्यावर सुद्धा स्वच्छता होती..पण एक गोष्ट मला खटकली,तिथे एक वृद्ध कर्मचारी व्यक्ती हातामध्ये फडका घेवून उभी होती..तिथे येणा-या व्यक्तीने मुत्रविसर्जन करून झाल्यावर उभे राहणाच्या जागी जे शितोडे उडतात..ते हातातल्या फडक्याने साफ करण्याचे काम या वृद्ध व्यक्तीवर सोपवण्यात आले होते आणि ती व्यक्तीसुद्धा ते काम मनापासून करत होती..
त्याची ती स्थिती पाहून खरेच वाईट वाटले आणि मनात विचार आला..लोकांच्या
मुत्राचे उडालेले शितोडे हातातल्या कपड्याने स्वच्छ करताना या वृद्ध
व्यक्तीच्या मनात कोणते विचार येत असतील?रोज याच हातानी जेवताना त्याला
अन्न तरी गोड लागत असेल का?याच्या अश्या अवस्थेला नक्की जवाबदार
कोण?त्याच्या घरचे की आणखी कोणी?अश्या प्रकारे मुत्र साफ केल्यामुळे त्याला
संसर्गजन्य आजार तर होणार नाही ना?इत्यादी इत्यादी.
खरच परिस्थिती माणसाला इतके हतबल बनवते?की लाचार होऊन माणूस जगण्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार होतो.
खरचं दैव जाणले कुणी!
खरच परिस्थिती माणसाला इतके हतबल बनवते?की लाचार होऊन माणूस जगण्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार होतो.
खरचं दैव जाणले कुणी!
0 comments:
Post a Comment