मित्रमंडळी,
तुम्ही जर कलाकार असाल तर ५००० च्यावर लोकांना तुम्ही तुमच्या मित्रपरिवारात घेवू शकत नाही..त्यामुळे कधी कधी
तुम्ही तुमचे प्रोफाईल फॅनपेजमध्ये बदलता..हे कसे करायचे ते आपण या आधी एका लेखामध्ये पाहिले आहेच..अधिक माहिती साठी अनुक्रमणिका फेसबुक टिप्स आणि ट्रिक्स विभागात शोध
घ्यावा.
पण असे प्रोफाईल फॅनपेजमध्ये बदली केल्याने तुम्हाला तुमच्या मित्रमंडळीच्या नोंदी मिळणे बंद होते.मग पेजमध्ये बदली झालेले प्रोफाईल परत मिळाले तर बरे होईल असे वाटू लागते..पण हे शक्य आहे काय?
होय हे परत मिळवणे सहज शक्य आहे.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा मोबाईल मधून हा दुवा पाहात असला तर desktop help लिंक पर्यायावर टिचकी द्या.हे करताना तुम्ही कोणत्याही दुस-या फेसबुक खात्यातून
लॉग-इन असता कामा नये.
https://www.facebook.com/help/205056142869433
२)आता तुम्हाला चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे संदेश दिसेल.
त्यातील request for a reversal पर्यायावर टिचकी द्या.
३)पुढील पानावर Tell Us About Your Account नावाचा पर्याय दिसेल.
त्यातील Connecting personally with friends and family पर्याया समोरचा चेकबॉक्स निवडा.
असे केल्याने खालील फॉर्म उघडेल त्यात योग्य ती माहिती भरा.
तुमच्या खात्याची सत्यता पडताळण्यासाठी तुम्हाला सरकारमान्य आयडी कार्डची एक कॉपी स्कॅनकरून तुमच्या संगणकावरून फेसबुक फॉर्ममध्ये अपलोड करावी लागेल. उदा.जन्म दाखला,पासपोर्ट,ड्राईव्हिंग लायसन्स इत्यादी.
मग सेंड पर्याय वापरून ही माहिती फेसबुककडे जमा करा.
असे केल्याने तुमचे चाहत्यांच्या पानामध्ये बदली झालेले फेसबुक प्रोफाईल,फेसबुक कडून पडताळणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला परत मिळेल.
धन्यवाद
0 comments:
Post a Comment