साउंड क्लाउडच्या लिंक तुमच्या ब्लॉगर ब्लॉगच्या पोस्टमध्ये कश्या समाविष्ट कराल?याचीमाहिती आज आपण करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
1)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा.
https://soundcloud.com/
२)यानंतर या साईट वर नाव नोंदणी करा. फेसबुक अथवा गुगल खाते वापरून सुद्धा तुम्ही या ठिकाणी नाव नोंदणी करू शकता.
३)नाव नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला साईट वर प्रवेश मिळेल,यानंतर तुम्हाला तुमचे जे गाणे अपलोड करायचे आहे ते अपलोड करण्यासाठी upload पर्यायावर टिचकी द्या.
आणि तुमच्या संगणकावरून हवे ते गाणे अपलोड करा.
४)गाणे अपलोड केल्यावर गाण्याखाली दिसणा-या शेअर पर्यायावर टिचकी द्या.
५) मग Embed पर्यायावर टिचकी देवून iframe कोड कॉपी करून घ्या
६)आता तुमच्या ब्लॉगर खात्यावर प्रवेश करून न्यू पोस्ट पर्याय निवडून html ची निवड करा
आणि या आधी कॉपी केलेला कोड पेस्ट करा.
असे केल्यानंतर पोस्ट प्रकाशिते केल्यावर ते गाणे,कविता अथवा संगीत तुमच्या पोस्ट मध्ये खालील प्रमाणे समाविष्ट झालेले दिसेल.
नमस्कार,
मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.
1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.
**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.
कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट
४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे
savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra
धन्यवाद :-)
0 comments:
Post a Comment