गुगल ड्राईव्हवर शेअर केलेल्या फाईलची डाउनलोड लिंक कशी मिळवाल? जेणेकरून ती आपण आपल्या ब्लॉग पोस्ट मध्ये अथवा इमेल मध्ये डाउनलोड पर्यायाखाली देवू शकतो याची माहिती आपण घेणार आहोत.
सध्या आपल्यापैकी बरेच जण गुगल ड्राईव्हचा वापर फाईल फाईल संग्रहित करण्यासाठी आणि त्याची लिंक इतरांबरोबर शेअर करण्यासाठी वापरतो.पण जर पीडीएफ फाईलची डाऊनलोड लिंक देता आली तर? हो आता हे शक्य आहे.
हे कसे कराल?
१)प्रथम तुम्ही जी पीडीएफ फाईल अपलोड केलेली आहे आणि पब्लिक पर्याय वापरून इतरांसोबत शेअर केलेली आहे तिचा शेअर करण्यासाठी असलेला दुवा कॉपी करून घ्या.
२)यानंतर तुमच्या गुगल क्रोम ब्राउजरमध्ये खाली दिलेली वेबसाईट उघडा.
https://sites.google.com/site/gdocs2direct/
३)साईट उघडल्यावर Enter your sharing URL: खाली असलेल्या मोकळ्या जागेत मघाशी कॉपी केलेली गुगल ड्राईव वरील लिंक पेस्ट करा आणि मग Create Direct Link पर्यायावर टिचकी द्या.
असे केल्याने Output link: च्या खाली दिसणा-या मोकळ्या जागेत त्या फाईलची डाउनलोड लिंक मिळेल.(चित्र पहा)
४)आता ती लिंक तुमच्या ब्लॉग पोस्टमध्ये डाउनलोड पर्याय देवून डाउनलोड साठी उपलब्ध करून द्या..किंवा ज्याना ती डाउनलोड करायची असेल त्यांच्या सोबत शेअर करा.
उदा.
फाईल डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड पर्यायावर टिचकी द्या .
डाउनलोड
धन्यवाद :-)
0 comments:
Post a Comment