सर्व मित्रमंडळीना,
अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा, आज २१ तारीख माझा वाढदिवस होता,त्याची आठवण ठेवून ज्यांनी वेळातवेळ काढून शुभेच्छा दिल्या त्यांचे सुद्धा मनापासून आभार! गेले बरेच दिवस स्त्रीयांसाठी विशेषत: मराठी मुली आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र सोशल नेटवर्क त्यांच्या हक्काचे व्यासपीठ का असू नये? असा विचार मनात घोळत होता...तो आज प्रत्यक्षात उतरला आहे याचा मला आनंद आहे.आज मी मराठी मुली आणि स्त्रियांसाठी एक सोशल नेट्वर्किंग साईट प्रायोगिक तत्वावर सुरु केली आहे. चिवचिवाट.कॉम http://www.chivchivat.com असे त्या साईटचे नाव आहे.
फेक प्रोफाईलला आळा घालण्यासाठी खात्याची सत्यता पडताळण्यासाठी सध्या फेसबुक वापरून प्रवेश ही पद्धत वापरण्यात आली आहे. त्यासाठी वर दिलेल्या "फेसबुक वापरून प्रवेश" पर्यायावर क्लिक करा.आता फेसबुकचे लॉगइन पेज उघडेल,पुढच्या पाय-या पूर्ण करा,थोडी वाट बघा,आणि मग chivchivat login appला "ओके" करून परवानगी द्या आणि मग दरवेळी तुमच्या फेसबुक खात्याचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून,अथवा फेसबुक वर लॉगइन असताना, साईटवर सहज प्रवेश करा.असे केल्याने तुम्हाला दोन्ही ठिकाणी लॉगइन राहणे शक्य होईल.
मित्रानो मार्केटिंग करण्यासाठी पैशाची आणि मनुष्यबळाची कमी आहेच,पण इच्छाशक्तीची कोणतीही कमी नाही. त्या जोरावरच हे पाउल उचलले आहे,हा प्रयोग यशस्वी झाल्यास अधिक ताकदीची आणि सुविधा असलेली साईट बनवणे ३-४ महिन्यात शक्य होईल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दामोदर रेडकर
0 comments:
Post a Comment