मित्रानो ब-याच वेळा तुम्ही फेसबुक सर्च पर्यायाचा वापर करून ब-याच गोष्टी शोधत असता,काय काय शोधता ते तुम्हाला माहित असेलच,तर तुम्ही जे जे काही शोधता ते फेसाबुक खात्याच्या रेकॉर्ड मध्ये नोंदविले जाते.जेणे करून पुढच्या वेळी पुन्हा ती गोष्ट शोधण्यासाठी त्याचा तुम्ही वापर करू शकाल.
पण हाच पर्याय कधी तरी तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतो विशेषता तुम्ही नात्यामध्ये गुंतलेले असाल तर बहुतेक वेळा नवरा बायको,प्रियकर प्रेयसी एकमेकांची फेसबुक खाती वापरतात.त्यामुळे या पर्यायाचा वापर करून जर तुम्ही कोणा विशिष्ट व्यक्तीचा,इतर गोष्टींचा शोध घेतला असेल तर त्याची माहिती इथे नोंदविली जाते आणि ती जर दुस-या व्यक्तीने पाहिली तर काय होईल याचा तुम्हाला अंदाज असेलच.
तर ही सर्च हिस्ट्री नष्ट कशी करायची याची हे आता आपण जाणून घेवूया
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या फेसबुक खात्यावर लॉगीन व्हा.
२)यानंतर कोप-यामध्ये जे गोलाकार चिन्ह दिसते आहे त्यावर टिचकी द्या (Click करा)
३)खाली दिसणा-या पर्याया पैकी Activity Log नावाचा पर्याय निवडा.
४)यानंतर जे पान उघडेल त्यावर बाजूला असलेल्या यादीतील more पर्यायावर टिचकी द्या.
५)आता तुम्हाला त्या यादी मध्ये search पर्याय दिसेल त्यावर टिचकी द्या.
६)आता उघडलेल्या पान तुम्हाला आतापर्यंत तुम्ही फेसबुक वर काय काय शोधलेत ते सर्व दिसेल.
त्याच्या वरच्या कोप-यामध्ये पानावरील सर्व सर्च हिस्ट्री नाहीशी करण्यासाठीचा पर्याय दिसेल.
७)त्यावर टिचकी दिल्यावर खालील प्रमाणे संदेश दिसेल.
८)यातील clear Searches पर्यायावर टिचकी द्या.असे केल्याने तुमची सर्व सर्च हिस्ट्री निघून जाईल.
हे करण्याआधी जर तुमच्या कडे तुमच्या नवा-याचा अथवा प्रियकर प्रेयसीच्या फेसबुक खात्याचे युजरनेम अथवा पासवर्ड असेल तर आताच लॉगीन करून बघा ते फेसबुक वर नक्की काय शोधतात :p :D
ता.क.: आठ क्रमांकाच्या पायरीला विनोद म्हणूनच पहावे ;-)
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment