- यांचे संपूर्ण नाव: माणिक सीताराम गोडघाटे.
- यांचा जन्म १० मे, १९३७ रोजी झाला.
- "चंद्रमाधवीचे प्रदेश","राजपुत्र आणि डार्लिंग","संध्याकाळच्या कविता","सांजभयाच्या साजणी","सांध्यपर्वातील वैष्णवी" हे त्यांनी लिहिलेले कविता संग्रह आहेत.
- "वा-याने हलते रान","संध्यामग्न पुरुषाची लक्षणे","मृगजळाचे बांधकाम","कावळे उडाले स्वामी","ओल्या वेळूची बासरी","चर्चबेल","मितवा" हे त्यांचे ललित लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहेत.
- ग्रेस यांची "वा-याने हलते रान" ही रचना निवडुंग या चित्रपटात गीत म्हणून गायली गेली आहे.
- "भयं इथले संपत नाही" ही त्यांची कविता दूरदर्शन वरील महाश्वेता मालिकेमध्ये शीर्षक गीत म्हणून वापरली गेले आहे."निष्पर्ण तरूंची राई" असे त्या कवितेचे नाव आहे.
- "वा-याने हलते रान" ललितलेखसंग्रहासाठी २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना देण्यात आला होता.
- १९९७ मध्ये त्यांना जीवनव्रती पुरस्कार, विदर्भ साहित्य संघ, नागपूर तर्फे देण्यात आला.
- संध्याकाळच्या कविता,"चंद्रमाधवीचे प्रदेश","राजपुत्र आणि डार्लिंग" या काव्यसंग्रहाना आणि "चर्चबेल" या ललित लेखसंग्रहाला महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार मिळालेले आहेत.
- "नागभूषण पुरस्कार, नागभूषण फाऊंडेशन, नागपूर","विदर्भ गौरव पुरस्कार, कृषी विकास प्रतिष्ठान, नागपूर""सहकारमहर्षी साहित्य पुरस्कार, सोलापूर""जी. ए. कुलकर्णी सन्मान पुरस्कार, पुणे","विदर्भ भूषण पुरस्कार","वाग्विलासिनी पुरस्कार" असे अनके पुरस्कार देवून त्यांचा वेळोवेळी गौरव करण्यात आलेला आहे.
- वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी, २६ मार्च,२०१२ साली त्यांचा मृत्यू झाला.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment