मंडळी,
तुम्ही तुमची विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम तुमच्या संगणकावर कधी प्रस्थापित केलीत? हे जर तुमच्या लक्षात नसेल. तर ती तारीख शोधणे फारसे कठीण नाही.
त्यासाठी फक्त हे करावे लागेल..
१)प्रथम तुमचा संगणक सुरु करा.
२)मग संगणकाच्या कमांड प्रॉंट वर जा.
START>>RUN>>मध्ये जावून CMD टाईप करा.
३)या नंतर तिथे systeminfo टाईप करा.
उदा.
c:\systeminfo
४)असे केल्यावर काही सेकंदात संपूर्ण माहिती दिसू लागेल त्यातील original installation date या पर्यायासमोर तुम्हाला तुमच्या संगणकावर तुम्ही ज्या दिवशी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम प्रस्थापित केलीत ती तारीख भेटेल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर
mac os pendrive मध्ये कसे इन्स्टाल करावे.
ReplyDelete