मंडळी आज आपण तुमच्या संगणकावरील रिसायकल बिनचे नाव कसे बदलायाचे याची माहिती करून घेणार आहोत.
असे केल्याने तुम्ही तुमच्या रिसायकल बिनचे नाव तुम्हाला हवे तसे बदलू शकता.
हे कसे कराल?
१)तुमच्या संगणकावर
start>>run मध्ये जावून regedit टाईप करा.
२)यानंतर जे पान उघडेल त्यावर HKEY_CLASSES_ROOT\CLSID\ मध्ये जा
मग find पर्यायाचा वापर करून {645FF040-5081-101B-9F08-00AA002F954E} चा शोध घ्या.
३)आता तुम्हाला चित्रात दाखविल्याप्रमाणे विंडो दिसेल.यातील LocalizedString पर्याय्यावर दोन वेळा टिचकी देवून तो उघडा आणि
@%SystemRoot%\system32\shell32.dll,-8964 च्या जागी तुम्हाला जे हवे आहे ते नाव टाका.
४) केलेले बदल जतन केल्यावर तुमच्या संगणकाची स्क्रीन f5 की दाबून रीफ्रेश करा असे केल्यावर तुम्हाला तुमच्या संगणकावरील वरील रिसायकल बिनचे नाव बदललेले दिसेल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर.
0 comments:
Post a Comment