पेन ड्राइव्हपासून तुमच्या संगणकाला सुद्धा धोका निर्माण होवू शकतो. तुमच्या संगणकावरील माहिती चोरीला जाण्या पासून ते तुमच्या संगणकावर विषाणू येण्या पर्यंत अनेक बाबतीत पेन ड्राइव्ह कारणीभूत होवू शकतो.
मग असा कोणता मार्ग आहे? ज्याचा वापर करून आपण संगणक वापरकर्त्यांना तुमच्या संगणकाला पेन ड्राइव्ह जोडून माहिती चोरण्यापासून अटकाव करू शकतो? याचीच माहिती आज आपण करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमचा संगणक सुरु करा.
२)मग regedit टाईप करून तुमच्या संगणकाची Registry उघडून खाली दिलेल्या की चा शोध घ्या.
HKEY_LOCAL_MACHINE\SYSTEM\CurrentControlSet\Services\UsbStor
(नोंद:कोणतेही बदल करण्यापुर्वी ते कसे करायचे हे माहीत नसेल तर तज्ञ व्यक्तीची मदत घ्या )
चित्र पहा
३)या नंतर उजव्या बाजूला असलेल्या Start पर्यावर टिचकी देवून value data: 3 ऐवजी 4 असा बदल करा.
चित्र पहा.
४)या नंतर केलेले बदल जतन करा.
५)असे केल्याने कोणाची संगणक वापरकर्त्याला तुमच्या संगणकाला पेन ड्राइव्ह जोडून त्यावरची माहिती उतरवून घेता येणार नाही.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर
0 comments:
Post a Comment