गणपतीसाठी मी कोकणातल्या माझ्या गावी गेलो होतो.विसर्जना नंतर ट्रेनचा प्रवास करून रात्री उशिरा स्टेशन वर पोहोचलो.माझ्या सोबत आई आणि माझा लहान भाऊ होता.बाकी अनेक सहप्रवासी सुद्धा आपल्या कुटुंबां सोबत घरी जाण्यासाठी रिक्षा थांब्यावर थांबले होते...बरीच मोठी रांग होती..पण रिक्षाचा काही पत्ता नव्हता.
१२ वाजून गेले होते, १२ नंतर रिक्षा थांब्यावर एकही रिक्षा थांबेना..जे येत होते ते रिक्षावाले बाहेरूनच पळत होते. :-/ प्रवाश्याना उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती.
कुटुंबां सोबत परतणारे लोक..या प्रकाराने कंटाळले होते...मग माझ्यातला अॅन्ग्री यंग मॅन जागा झाला..रांगेत नसलेल्या प्रवाश्याना घेवून जाणारी रिक्षा समोरून येताना दिसली,म्हणून सरळ सामानाच्या पिशव्या घेवून समोरून भरधाव येणा-या रिक्षा समोर रस्त्यात उभा राहून ती थांबवली,नियम बाह्य कृती केल्या बद्दल त्याला सुनावले.
आतले प्रवासी कोण आहेत ते बघितले तर ते २ पोलीसवाले निघाले.. :-D...आई घाबरली म्हणाली जावू डे..इथे कोणी काही बोलत नाहीत तर तू का बोलतो आहेस?
तरीही नियमावर बोट ठेवून ते कशी चुकीची कृती करत आहेत,हे मी त्याना दाखवून दिलेस.
मग पुढे जावून ते रिक्षातून उतरले आणि त्यांनी रिक्षा वाल्याला मला आणि माझ्या कुटुंबियाना घेवून जाण्यास सांगितले.
याचा अर्थ एकच: यम आणि नियम कोणाला चुकत नाहीत ते पाळावेच लागतात..निदान माझ्या समोर तरी. ;-)
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment