- मित्रानो माझा गाव रेडी आहे.
- सिंधुदुर्ग जिल्यामधले एक गाव जे लोह,मँगेनीजच्या खाणी व स्वयंभू गणपती यांच्यासाठी प्रसिद्ध आहे.
- या गावाचे प्राचीन नाव रेवती द्वीप असे आहे.
- निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभलेले आणी प्राचीन इतिहासाचा एक मूक साक्षीदार असलेले माझे हे गाव.
- सध्या खाण उद्योगामुळे निसर्गाची हानी सुरु आहे.पण याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही.
- इथून पुढे गोव्याची सीमा सुरु होते.
- इथल्याच एका किल्ल्याची आपण आज माहिती करून घेणार आहोत.
- त्याचे नाव आहे यशवंत गड.
- चालुक्य राजा स्वामीराजाचे रेडी हे प्रमुख व्यापारी केंद्र होते.
- समुद्रातून खाडीमार्गे होणार्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी हा किल्ला बांधला गेला.
- आदिलशहाकडून या किल्ल्याचा ताबा सावंतवाडीच्या सावंतांकडे गेला.
- त्यानंतर शिवाजी महाराजानी या किल्ल्याचा ताबा घेवून त्याची दुरुस्ती केली.
- असा हा प्राचीन किल्ला अजूनही सुस्थितीत आहे...पण आणखी किती वर्ष राहील? या बाबत शंका आहे
- . शासनाने जर जुने दुर्ग किल्ले यांचे जतन केले तरच असा ऐतिहासिक वारसा जपला जाईल. :-(
- खाली दिलेल्या चित्र संचायीकेमध्ये मी या किल्ल्यावर जावून काढलेली छायाचित्रे तुम्ही पाहू शकता. गणपती मध्ये पुन्हा जायचा योग आला तर चलचित्रीकारण करून आणेन. छायाचित्रे पहा. तुम्हाला आवडतील.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment