आधीच सांगितल्या प्रमाणे माझ्या रेडी गावाला पुरातन काळा पासूनचा इतिहास आहे.
त्यां इतिहासाची साक्ष देणारी आणखी एक गोष्ट मला तिथे सापडली ती म्हणजे दगडात कोरलेली हत्तीची सोंड.
ह्या परिसरात लोह खनिजाच्या खोल खाणी आहेत.त्यामुळे या ठिकाणी जाताना थोडे सावध असावे लागते. माउली मंदीर परिसरात स्थानिक गावका-यांना विचारले तर ते या ठिकाणी जाण्याचा रस्ता दाखवू शकतील.
मी मात्र जाताना डोंगरा मागे, जो जंगल परिसर आहे त्यातून वाट काढून गेलो होतो..या वाटेने माहिती अभावी जाणे धोकादायक ठरू शकते. हत्तीची सोंड पाहण्यासाठी तुम्हाला डोंगराच्या तळाला असलेल्या ओबडधोबड रस्त्याने सुरुवात करून..तिथे काळ्या कातळात काही पाय-या (सांभाळून कारण त्या पाय-या म्हणण्या पुरत्याच पाय-या आहेत.)चढून गेल्यावर तुम्हाला झाडी मध्ये लपलेली पाषाणात कोरलेली हत्तीची सोंड दिसते.
सोंडे समोरच काही अंतरावर एक गोलाकार कोरलेला दगड आहे..तो बहुतेक ध्वजस्तंभ असावा.हवा जास्त असल्यामुळे कडेला जाण्याचा धोका पत्करू नये.एका बाजूला दूरवर पसरलेल्या समुद्राचे सुंदर दर्शन होते..तर दुस-या बाजूला खोल खाणींचे निरीक्षण करता येते.
सोंडे खाली असलेल्या डोंगर मध्ये राहता येण्याजोगे चौकोनी गुफासदृष्य भाग आहेत...पण तिथे आत जाण्याचा मार्ग मला सापडला नाही...तसेही तिथे जाणे धोक्याचे ठरले असते. प्राचीन काळी या जागेचा समुद्रातून येणा-या शत्रुवर लक्ष ठेवण्यास उपयोग होत असावा.
ही हत्तीची सोंड एका बाजूने आता कोसळलेली आहे.. :-(...आणखी किती वर्ष ती शाबूत राहील हे सांगणे कठीण आहे,आणी याला जवाबदार कोण हे सांगण्याची गरज नसावी. खाली दिलेल्या चित्र संचयिके मध्ये तुम्ही हत्तीची ही सोंड आणी परिसर पाहू शकाल.

0 comments:
Post a Comment