माझ्याअनुदिनीचे वाचक बिपीन यांनी मध्यंतरी मला प्रश्न विचारला होता की अनुदिनी अथवा वेबसाईट उघडल्यावर फेसबुकचा लाईक पर्यांय प्रथम दिसेल त्यानंतरच अनुदिनीवर अथवा साईट वर प्रवेश मिळेल अशी रचना कशी करावी?
आज आपण त्याचीच माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर प्रवेश करा.
२)त्यानंतर तुमच्या अनुदिनीच्या Template>> Edit HTML>>Proceed पर्यायावर वर टिचकी द्या.
३)काहीही बदल करण्या आधी बॅकअप घ्यायला विसरू नका.
४)</body> चा शोध घ्या
५)यानंतर खाली दिलेला कोड उतरवून(ctrl+c) त्या आधी डकवा(ctrl+v).
१)वर दिलेल्या कोड मध्ये www.facebook.com/prashantredkarsobat च्या जागी तुमच्या फेसबुक पेजचा पत्ता असा बदल करा.
२)३० सेकंदाचा कालावधी ठेवलेला आहे तो तुम्ही वरील कोड मध्ये जावून timeout: 30 मध्ये बदल करून हवा तितका ठेवू शकता.
३)फेसबुक लाईक बटनाचा हा पर्याय वाचकांनी साईटला भेट दिल्या वर लगेच दिसतो..जर तुम्हाला असे वाटत असेल की तो १ मिनिट नंतर अथवा मध्ये कधीतरी दिसावा तर त्यासाठी wait: 0 मध्ये योग्य तो बदल करा.
प्रात्यक्षिक पाहण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर जा.
http://prasadredkar.blogspot.in/
धन्यवाद ,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
प्रिय प्रशांतजी,फेसबूक लाईक चे बटन माझ्या ब्लॉगवर येते आहे पण त्यात आपण सुचवलेला url चा बदल करूनही बॉक्सवर माझ्या ब्लॉगचे नावाऐवजी आपल्या साईटचे नांव येत आहे.संपूर्ण कोडमध्ये ३-४ ठिकाणी तरी तुमच्या साईटचे नांव आहे पण तेथे बदल करून काय ठेवायचे ते कळले नाही. कृपया अधिक स्पष्टीकरण दिलेत तर बरे होइल.खूप खूप आभार.
ReplyDeleteKNFBFansPRO='Prashantredkarsobat'
ReplyDeleteया ठिकाणी तुमच्या अनुदिनीचे नाव टाका
आणि
url: 'http://www.facebook.com/prashantredkarsobat', च्या जागी तुमच्या फेसबुक पानाचा पत्ता
Ok. Thanks again Prashantji !
ReplyDelete