- विश्वनाथ वामन बापट
- यांचा जन्म २५ जुलै,१९२२ रोजी महाराष्ट्रातील कर्हाड झाला.
- हे एक प्रतिभासंपन्न कवी व ललित लेखक होते.
- ते "साधना" साप्ताहिकाच्या संपादक सुद्धा होते.
- तसेच राष्ट्रसेवादलाच्या कलापथकाचे अध्वर्यू होते.
- बिजली,सेतू,अकरावी दिशा,प्रवासातील कविता,सकिना,मानसी इत्यादी त्यांचे काव्यसंग्रह आहेत.
- बारागावचं पाणी, हे प्रवासवर्णन पर लेखन त्यांनी केलेले आहे.
- जिंकून मरणाला,विसाजीपंताची बखर हे गद्य लेखन व तौलनिक साहित्याभ्यास हे समीक्षात्मक पुस्तक प्रकाशित झालेले आहे.
- प्रगल्भ सामाजिक जाणिव,रसमुग्ध निसर्ग चित्रण,लडीवाळ श्रुंगार भावांची नाटयपूर्ण रुपे,इतिहासाचे प्रेम,थोर विभुतींबद्दल नितांत आदरभाव,साहित्य संगीतादी कलांबाबतची आवड हे विशेष त्यांच्या गद्य लेखनात ठळकपणे आढळतात.
- १९७२ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
- २७ सप्टेंबर,२००२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment