- वि.स.खांडेकर
- यांचे संपूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर आहे.
- यांचा जन्म जानेवारी १९, १८८९ रोजी झाला.
- कादंबरी,कथा,लघुकथा आणि समीक्षा या वाडमय प्रकारात त्यानी विपुल लेखन केले आहे.
- उल्का,दोन धृव,कौचवध,ययाती,अमृतवेल,इत्यादी कादंब-या त्यांनी लिहिलेल्या आहेत.
- हस्ताचा पाऊस,घरटयाबाहेर,सांजवात, इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
- अविनाश,मंझधार,इत्यादी लघुनिबंध संग्रह.
- मृगजळातल्या सावल्या,सुवर्णकण,वेचलेली फुले इत्यादी रुपक-कथा संग्रह प्रकाशित.
- छाया,देवता,सुखाचा शोध इत्यादी पटकथा त्यांनी लिहिलेल्या आहेत.
- रंकाचे राज्य हे नाटक देखील लिहिले आहे.
- समीक्षा लेखसंग्रह,भाषणे,संपादने अशी विपुल साहित्यसंपदा.
- त्यांच्या अनेक साहित्य कृतींची इतर भारतीय भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत आणि ती लोकप्रिय ठरली.
- ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (सोलापूर १९४१) आणि मराठी नाटयसंमेलनाचे (सातारा १९५७) अध्यक्ष होते.
- याना भारत सरकारकडून १९६८ मध्ये पद्मभूषण किताबाने सन्मानित करण्यात आलेले आहे.
- ययाति या कादंबरीला साहित्य अकादमीचा,तसेच ज्ञानापीठ हा भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे.
- कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहला केली.
- जीवनवादी दृष्टीकोणाचा पुरस्कार,साम्यवादाचा,गांधीवादाचा प्रभाव ,ध्येयवादी वृत्ती आणि अलंकारिक लेखनशैली ही त्यांच्या लिखाणाची विशिष्ट आहेत.
- याचा मृत्यु सप्टेंबर २, १९७६ रोजी झाला.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment