- विष्णू वामन शिरवाडकर याना आपण सर्व कुसुमाग्रज या नावाने देखील ओळखतो.
- यांचा जन्म २७ फेब्रुवारी, १९१२ मध्ये झाला.
- ते मराठी साहित्यसृष्टितील अग्रगण्य कवी आणि नाटककार होते.
- 'जीवनलहरी','विशाखा','किनारा',वादळवेल,'मराठी माती','छंदोमयी','मुक्तायन','पाथेय'. हे त्यांचे कविता संग्रह आहेत.
- दूरचे दिवे,ययाती आणि देवयानी,नटसम्राट,वीज म्हणाली धरतीला,विदुषक ही त्यांनी लिहिलेली नाटके आहेत.
- कल्पनेच्या तीरावर,विष्णव,जानकी या कादंब-यांचे लिखाण देखील त्यानी केलेले आहे.
- "आहे आणि नाही" हा त्यांच्या ललित लेखांचा संग्रह आहे.
- १९६४ मध्ये गोव्या मधल्या मडगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
- "ज्ञानापीठ" या भारतीय साहित्या सृष्टीतील सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.
- १९९१ मध्ये भारत सरकारने साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामधील पद्मभूषण पुरस्कार देवून त्यांना सन्मानित केलेले आहे.
- विष्णू वामन शिरवाडकर यांचा मृत्यु १० मार्च १९९९ रोजी झाला.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment