मंडळी,आताच काही चलचित्रांमध्ये बदल करायचा विचार करत होतो तसेच मला त्यातला आवाज सुद्धा संपूर्ण पणे काढून टाकायचा होता.ते मी यशस्वी पणे केले आता आपण तुमच्या चलचित्रामधून आवाज कसा काढून टाकायचा? याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा.
http://www.solveigmm.com/en/products/avi-trimmer-mkv/
२)डाउनालोड पर्यायाचा वापर करून १० एमबीची फाईल डाउनलोड करून घ्या.
३)त्यानंतर त्या फाईल वर टिचकी देवून तो प्रोग्राम तुमच्या संगणकावर प्रस्थापित करा.
४)यानंतर चित्रामध्ये दाखविलेला पर्याय वापरून ज्यात बदल करायचा आहे ती चित्रफित निवडा.
५)यानंतर चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे ऑडीओ पर्यायासमोरील टिचकी काढून टाका.
६)चित्रफितीची सुरुवात आणि शेवट निवडा.
७)मग सेव्ह पर्यायावर टिचकी देवून ती चित्रफित तुमच्या संगणकावर जतन करा.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा.
http://www.solveigmm.com/en/products/avi-trimmer-mkv/
२)डाउनालोड पर्यायाचा वापर करून १० एमबीची फाईल डाउनलोड करून घ्या.
३)त्यानंतर त्या फाईल वर टिचकी देवून तो प्रोग्राम तुमच्या संगणकावर प्रस्थापित करा.
४)यानंतर चित्रामध्ये दाखविलेला पर्याय वापरून ज्यात बदल करायचा आहे ती चित्रफित निवडा.
६)चित्रफितीची सुरुवात आणि शेवट निवडा.
७)मग सेव्ह पर्यायावर टिचकी देवून ती चित्रफित तुमच्या संगणकावर जतन करा.
८)असे केल्याने तुमच्या चित्रफितीतून तुम्ही आवाज काढून टाकू शकाल...याच प्रमाणे जर तुम्हाला चित्रफितीमधील काही भाग काढून टाकायचा असेल तर हवी ती सुरुवात आणि शेवट निवडून तितकाच भाग जतन करा.
पुढच्या लेखात आपण .एव्हीआय रुपातली चित्रफित आकाराने छोटी कशी करायची याची माहिती करून घेणार आहोत.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment