नमस्कार मंडळी,
गणपती निम्मिताने कोकणामध्ये माझ्या गावी गेलो होतो.कालच परतलो.परत एकदा माझ्या प्रवासानुभावातून जे काही नवीन सापडले ते या अनुदिनीवर मी लिहीनच. :-)
जाण्याच्या गडबडी मध्ये एक बातमी सांगायची राहिली ती म्हणजे बुकगंगा तर्फे आयोजित करण्यात आलेल्या विश्वसाहित्य संमेलनात माझ्या अनुदिनीला सर्वाधिक पसंती मिळाल्याने मला "आवडता ब्लॉगर" पुरस्कार मिळाला त्या बद्दल सर्व अनोळखी आणि ओळखीच्या वाचकांचे मनापासून आभार.
मी नेहमीच माझ्या या अनुदिनीवर वेगवेगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आहे.जाणून बुजून राजकारण आणि इतर सामाजिक वातावरण बिघडवतील अश्या स्फोटक विषयावर लिहायचे टाळले आहे.
नवीन अनुदिनी लिहिताना मला झालेला त्रास,इतर नवीन लेखकांना होवू नये आणि मराठी मध्ये अधिकाधिक चांगल्या दर्जाच्या अनुदिन्या निर्माण व्हाव्या यासाठी मदत केली आहे. इथे जे काही लिहितो ते माझ्या अनुभवावर आधारीत,माझे स्वत:चे लिखाण आहे आणि माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की मराठी मध्ये विविध विषयांची सखोल माहिती देणारे ब्लॉग निर्माण व्हावेत.त्यासाठी लागेल ती मदत करायला मी कायम तयार असेन.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment