- जयंत विष्णू नारळीकर
- हे विश्वविख्यात शास्त्रज्ञ आणी गणितज्ञ आहेत.
- यांचा जन्म १९ जुलै, १९३८ रोजी महाराष्ट्रातील कोल्हापुर मध्ये झाला.
- त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ होते.
- त्यांचे शिक्षण बिएससी (विज्ञान शाखेतील पदवी) पर्यंत झाल्यावर त्यानी पुढील शिक्षण कॅंब्रिज मध्ये पूर्ण केले.
- बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या त्यानी मिळवल्या.
- डॉ. हाईल-नारळीकर सिद्धांत ज्यात आईनस्टाईनच्या सापेक्षतावादातील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत,त्याचे ते प्रणेते आहेत.
- मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्याना सन्मानित करण्यात आलेले आहे.
- इ.स.१९६५ साली भारत सरकारचा पद्मभूषण किताब त्याना मिळालेला आहे.
- २००४ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.
- २०१० मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.
- त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला पुरस्कारही मिळाले आहेत.
- रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली आहेत.
- मराठी भाषेतून विज्ञान प्रसाराचे महत्त्वाचे कार्य त्यानी केलेले आहे.
- ते मराठीतील अग्रगण्य व राज्यपुरस्कार प्राप्त विज्ञान लेखक आहेत.
- यक्षाची देणगी,प्रेषित,वामन परत न आला,टाइम मशीनची किमया,याला जीवन ऐसे नाव,व्हायरस,अभयारण्य,अंतराळातील भस्मासुर,इ.विज्ञान कथा-कादंब-या प्रसिद्ध झालेल्या आहेत.
- विश्वाची रचना,गणितातील गमतीजमती,आकाशाशी जडले नाते,नभात हसरे तारे ही त्याची इतरही काही पुस्त्रके आहेत.
- वैज्ञानिक संकल्पना व समीकरणे यांची उकल त्यानी केलेली आहे.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment