मित्रानो सध्या गुगलच्या अन्द्रोईड प्रणालीवर आधारीत मोबाईल आणी उपकरणांचा वापर वाढला आहे...तर मग आपली वेबसाईट अथवा अनुदिनी तरी या वेगाने बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात मागे का राहावी?
यासाठीच आज आपण " तुमच्या वेबसाईट अथवा अनुदिनीसाठी मोफत अन्द्रोईड मोबाईल app कसे तयार करायचे?याची माहिती करून घेणार आहोत.यासाठी कोणत्याही तांत्रिक बाबींची माहिती असणे आवश्यक नाही..कोणीही ते सहज करू शकते.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्या वर जा.
http://www.appsgeyser.com
२)या नंतर CREATE APP या पर्यायावर टिचकी द्या.
३)Create App From>>> या पर्यायातून वेबसाईट ह्या पर्यायाची निवड करा.
४)जे पान उघडेल त्यावर आवश्यक ती सर्व माहिती दया.
मग create वर टिचकी दया..तुम्ही केलेले बदल कसे दिसतात ते तुम्ही प्रीव्हू मध्ये सुद्धा पाहू शकता.
५)या नंतर तुम्हाला तुमचे खाते तयार करण्याबाबत माहिती विचारली जाईल तिथे आवश्यक माहिती दया.चित्र पहा.
६)यानंतर पुढील पानावर तुम्हाला तुमच्या app साठीची डाउनलोड लिंक मिळेल.
७)Distribute या पर्यायावर टिचकी देवून तुम्ही विविध मार्ग वापरून तुमचे अन्द्रोईड app डाउनलोड साठी उपलब्ध करून देवू शकता.
८)माझ्या अनुदिनीचे अन्द्रोईड app डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या चित्रमय दुव्यावर टिचकी दया.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment