मित्रमैत्रिणींनो DNS changer या विषाणुमुळे जगभरातले संगणक संक्रमित झालेले आहे..भारतामध्ये सुद्धा २०००० च्या आसपास संगणकाना विषाणुचा संसर्ग झालेला आहे..तुमचा संगणक या विषाणुमुळे संसर्ग झालेला आहे किंवा नाही हे कसे ओळखावे याची आता आपण माहिती करून घेणार आहोत.
हे कसे ओळखाल?
१)प्रथम http://www.dns-ok.ca/ या दुव्यावर टिचकी द्या.
२)जे पान उघडेल त्यातील तळाला चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे Terms and Conditions दिसतील त्याखाली असलेल्या I Agree पर्यांयावर टिचकी द्या.
३)यानंतर जे पान उघडेल त्यावर जर तुमच्या संगणकाला DNS changer या विषाणुचा संसर्ग झालेला नसेल तर चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे हिरव्या रंगाची सुचना दिसेल.
जर तुमच्या संगणकाला DNS changer या विषाणुचा संसर्ग झालेला असेल तर लाल रंगामध्ये तुम्हाला तशी सुचना दिसेल.
तर आताच या दुव्याचा वापर करून तुमच्या संगणकाला DNS changer या विषाणुचा संसर्ग झालेला आहे किंवा नाही हे ओळखा आणि अधिकाधिक मित्रमंडळीना या बद्दल कळवा.
धन्यवाद!
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
Tichki dilyavar tumhi dakhavlya pramane paan ughadat nahi.
ReplyDeleteप्रशांत मित्रा तू या वेबसाईटवर प्रत्येक लिंक नवीन विंडो मध्ये उघडेल अशी व्यवस्था का केली आहेस? आम्हा वाचकांना याचा फार त्रास वाटतो. तरी नवीन विंडो फक्त तुझ्या वेबसाईट बाहेरील लिंकसाठी योग्य वाटते.
ReplyDeletewww.sarkarinaukri2020.com
धन्यवाद.
मी मराठी:
ReplyDeleteत्या दिवसानंतर ही साईट बंद झाली आहे.
सरकारी नोकरी व्यवस्थापक:प्रत्येक दुवा दुसर्या विंडो मध्ये उघडू देणे जास्त सोयीचे आहे कारण हल्ली बहुतेक
सर्व जण टॅब ब्राउजिंगचा वापर करतात.दुवा आहे त्याच विंडो मध्ये उघडू देणे म्हणजे वाचकांचा आपल्या साईटशी असलेला संपर्क तोडण्यासारखे आहे.