फेसबुक असो अथवा ऑर्कुट अथवा कोणतीही इतर सोशल नेटवर्किंग साईट फेक प्रोफाईल(खोटी खाती) बनवून इतरांच्या मित्रपरिवारात (विशेषत: मुलींच्या) आणि बर्याच मंद मुलांच्या मित्रपरिवारात घुसण्याचे प्रकार वाढत चाललेले आहेत.
वेळीच सावध व्हा नाहीतर कधीतरी गोत्यात यायला वेळ लागणार नाही.
१)जर त्या प्रोफाईलवर साउथ इंडियन मुलीचा अथवा पाकिस्तानी मुलीचा फोटो असेल.(कसे ओळखायचे? ते बघितल्यावर लक्षात येईल)
२)कोणतीही नावाजलेली कलाकार नसुन सुद्धा त्या प्रोफाईलची सर्व माहिती खुली असेल (उदा.फोटो अल्बम इत्यादी) आणि अल्बम मध्ये चित्रविचित्र अवस्थेतील मुलींची फोटो असतील.
३)प्रोफाईल वरचे नाव विचित्र पद्धतीचे संदर्भ न लागणारे आणि यमक जुळवून बनवलेले असेल.
४)अल्बम मध्ये असलेल्या चित्रविचित्र फोटोवर खोर्याने ओढता येतील इतक्या मंद मुलांच्या विचित्र कमेंट असतील आणि त्यावर त्या प्रोफाइलची निर्माती(हा बहुतेक वेळा मुलगाच असतो) काहीच प्रतिक्रिया देत नसेल.
५)मित्रपरिवारात इतरांना समाविष्ट करण्याची गती वाढलेली असेल आणि त्यात २०००-५००० च्या संख्येने मित्रमंडळी समाविष्ट केली जात असतील...तर सावधान..विशेषत:मुलींनो.
६)अश्या प्रकारे तुमच्या मित्रपरिवारात घुसुन तुमची खाजगी माहिती,अल्बम मधले फोटो चोरले जावून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता १००० पटीने वाढलेली असते आणि अश्या वेळी होणार्या परिणामाना फकत तुम्हीच जवाबदार असता.कारण याचा वापर पुढे फेक प्रोफाईल बनवण्यासाठी आणि अथवा अश्लील साईट वर केला जावू शकतो.
धन्यवाद
तुमचा मित्र,
प्रशांत रेडकर
0 comments:
Post a Comment